Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्याला तीस हजार करोना प्रतिबंधक लस उपलब्ध

जिल्ह्याला तीस हजार करोना प्रतिबंधक लस उपलब्ध

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्हाभरात करोना प्रतिबंधक लसीच्या तुटवडा असल्याने तसेच बौद्य पौर्णिमेची शासकीय सुट्टीमुळे आज जिल्हाभरात लसीकरण बंद होते. मात्र जिल्ह्याला आज 28 हजार 200 कोवीशिल्ड तर 2 हजार कोव्हॅक्सीन अशा एकुण 30 हजार 200 लस उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे गुरूवार (दि.27) पासून पुन्हा लसीकरण सुरळीत होणार आहे.

- Advertisement -

शहर तसेच जिल्ह्यात लसींची मागणी वाढली आहे. पंरतु त्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने लसींचा तुटवडा जाणवत आहे. या तुटवड्याचा सामना करत अडखळत लसीकरण सुरू आहे. मागील रविवारी मिळालेल्या 18 हजार लस संपल्याने आज दिवसभरात लस उपलब्ध नव्हती यामुळे तसेच बौद्ध पौर्णिमेनिमित्त साधत जिल्ह्यात आज लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.

दरम्यान मंगळवारी जिल्ह्यात दोन्ही मिळून 7 हजार 823 जणांना डोस देण्यात आले होते. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 9 लाख 6 हजार 277 जणांना लस देण्यात आली आहे. दरम्यान कोव्हॅक्सीन हे केवळ 45 वर्षांवरील दुसरा डोस बाकी असणारांना देण्यात येणार असल्याने ते इतरांना नाकारण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या