३० प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटली

३० प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटली

नागपूर | Nagpur

जिल्ह्यातील हिंगणी-सेलू (Hingani-Selu Rout) मार्गावरील पेंढरी (Pendhari) जवळ एक खाजगी बस (Private Bus) उलटल्याने बसमधील ५ प्रवासी जखमी झाले आहेत...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरकडून-हिंगणीमार्गे (Nagpur to Hingani) वर्धाकडे (Wardha) ही ट्रॅव्हल्स बस जात होती. या खासगी बसमध्ये एकूण ३० महिला प्रवासी (Passengers) होत्या. या सर्व महिला देवदर्शनासाठी जात होत्या.

मात्र हिंगणी-सेलू मार्गाजवळील पेंढरी घाटात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात (Accident) झाला. या अपघातातील बहुतांश महिला या नागपूरच्या त्रिमूर्ती आणि प्रताप नगर भागातील रहिवासी असल्याचे समजते.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल केले. तसेच पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com