
नांदगाव। प्रतिनिधी Nandgaon
नांदगाव तालुक्यातील ( Nandgaon Taluka ) हिसवळ बुद्रुक ( Hiswal Br ) येथील30 शेळ्यांचा विषबाधेने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पशुपालक समाधान बिन्नर यांच्या 15 शेळ्या तर पोपट सदगीर यांच्या 15 शेळ्या दगावल्या. पशुवैद्यकीय अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला . रात्री उशिरापर्यंत शेळ्यांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बिन्नर आणि सदगीर यांंच्या शेळ्या दुपार पासून एक एक शेळी आजारी पडली.आणि काही वेळांच्या अंंतराने त्या दगावल्या. पशुवैद्यकीय अधिकार्यांना याची माहिती दिली देण्यात आली .
त्यांनी घटनास्थळी धाव घेत शेळयांची तपासणी केली असता शिळे अन्न खाल्ल्याने शेळ्यांचा मृत्यु झाला असल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत पशुवैद्यकीय डॉ. ईश्वर जाधव हे शेळ्यांचे शवविच्छेदन करीत होते. पशपालकांनी शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.