Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यासीमा तपासणीत दर किमीला तीन रुपये चिरीमिरी

सीमा तपासणीत दर किमीला तीन रुपये चिरीमिरी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

देशांतर्गत मालवाहतूक करताना दर किलोमीटरला तीन रुपये केवळ चिरीमिरीत जात असून हा भ्रष्टाचार थांंबल्यास वाहतूक खर्चही निश्चित कमी होईल. तो कमी करण्यासाठी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कांँग्रेस आगामी काळात आग्रही भूमिका घेणार आहे, अशी माहिती ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमृतलाल मदान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

मोटर मालक कामगार वाहक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे नाशिकमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मध्य प्रदेशमधील 13 आरटीओ सीमा तपासणी नाके गुजरात मॉडेलप्रमाणे लगेच व बाकीचे चेकपोस्ट 14 डिसेंबर 2023 पर्यंत बंद करण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारतर्फे घेण्यात आला. त्याअनुषंगाने महाराष्ट्रामध्ये चेकपोस्ट बंंद करण्यासाठी अमृतलाल मदान तसेच विजय कालरा, मोटार मालक कामगार वाहतूक संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

महाराष्ट्रातही सीमा तपासणी पोस्ट बंद करण्यासाठी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने पुढाकार घ्यावा. तसेच महाराष्ट्रातील वाहतूक पोलीस व हायवे पोलीस यांच्याद्वारे ऑनलाईन चलान कारवाईचा खूप जास्त त्रास वाहतूकदारांना होत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. यासंदर्भात निवेदन देण्यात आलेे.

अमृतलाल मदान, विजय कालरा, राकेश तिवारी, सी.एल. मुकाती, राजेंद्र हान यांंचा मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव, अंजू सिंगल, विजय काकडे, बाबासाहेब सानप , चिराग कटिरा , किशोर सिंग, अवतार सिंग बिरदी , राजपूत , नरेश बंसल , अमन चौधरी, विनोद शर्मा, तेंजेंद्रसिंग बिंद्रा व पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या