Videos: अफगाणिस्तानमधील भयावह व्हिडिओ, विमानाला लटकणाऱ्या तिघांचा मृत्यू

Videos: अफगाणिस्तानमधील भयावह व्हिडिओ, विमानाला लटकणाऱ्या तिघांचा मृत्यू

काबूल

अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. तालिबानने (taliban) काबुलवर (Kabul)कब्जा केल्यानंतर नागरीक प्रचंड घाबरले आहे. अफगाणिस्थानातून (afghanistan)मिळेल, त्या परिस्थिती बाहेर पडण्याचा प्रयत्न कर आहे. तेथील परिस्थिती काही भयावह बनत आहे, हे दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे

Videos: अफगाणिस्तानमधील भयावह व्हिडिओ, विमानाला लटकणाऱ्या तिघांचा मृत्यू
अफगाणिस्तानची सत्ता हस्तगस्त करणारे तालिबान आहे तरी काय?

काबुल (Kabul)विमानतळ एकमेव मार्ग आहे जिथून लोक देश सोडून बाहेर जाऊ शकतात. त्यामुळेच मोठ्या संख्येने लोक तिथे जमले आहेत. अफगाणिस्तानमधील (afghanistan)विमानतळावर विमानांच्या अवतीभोवती नागरिकांना गर्दी केली आहे. यात एका अमेरिकन विमानाला लटकून प्रवास करण्याच्या प्रयत्नात हवेतून खाली पडून तीन जणांना मृत्यू झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तिन जणांचा पडून मृत्यू झाल्याचे दिसत आहे. विमानात जागा नाही म्हणून लोक रेल्वे, बसला जसं लटकावं तसं विमानाला लटकताना दिसत आहेत. काही लोकांनी विमान टेक ऑफ घ्यायच्या आधी विंगमध्ये बसून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. विमान ज्यावेळी हवेत होतं, त्यावेळी काही जणांना खाली पडून मृत्यू झाल्याचं व्हिडीओतून दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com