मोठी बातमी ! समुद्र किनाऱ्यावर बोटीत आढळल्या ३ एके ४७ रायफल्स

मोठी बातमी ! समुद्र किनाऱ्यावर बोटीत आढळल्या   ३ एके ४७ रायफल्स

मुंबई | Mumbai

रायगड जिल्ह्यातील (Raigad district) हरिहरेश्वरच्या समुद्र (Harihareshwar Sea) किनाऱ्यावर संशयास्पद (Suspicious) बोट (boat)आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे....

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हरिहरेश्वरमध्ये आज सकाळी संशयास्पद बोट आढळून आली होती. या संशयास्पद बोटीत ३ एके ४७ रायफली (3 AK 47 Rifles) आणि २५० जिवंत काडतूसे (cartridges) सापडली आहेत. त्यानंतर रायगड जिल्हा प्रशासन (Raigad District Administration) आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही बोट हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद स्थितीत समुद्रात होती. त्यानंतर ती बोट समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आली.

दरम्यान, या बोटीत शस्त्रास्त्र सापडल्याने यामागे काही घातपाताचा कट होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच ही बोट कुठून आली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. याशिवाय पोलीस या घटनेचा तपास करत असून जिल्हाभरात नाकाबंदी (Blockade) करण्यात आली आहे. तसेच रायगडमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com