मुख्य बातम्या
नाशिकमध्ये २८३ करोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले; सहा दगावले
नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमध्ये करोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या काही कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. आज जिल्ह्यात तब्बल २८३ रुग्ण वाढले आहेत. तर सहा रुग्णांचा मृत्यूदेखील झाला आहे. मृत्यू झालेले रुग्ण सर्वही नाशिक शहरातील असल्याचे समजते...
तसेच २०७ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचे किंचितसा दिलाला प्रशासनाला मिळाला आहे. नाशिक मनपा क्षेत्रात आज १४२ रुग्ण वाढले आहेत तर नाशिक ग्रामीण मध्ये आज 131 रुग्णांची भर पडली. मालेगावमध्ये आज ६ रुग्ण बाधित निघाले आहेत. तर जिल्हा बाह्य चार रुग्ण बाधित निघाले आहेत.
आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात १८४० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर यात आजच्या सहा रुग्णांची भर पडल्यामुळे मृतांचा आकडा १८४६ वर पोहोचला आहे.