Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याचोवीस तासात विक्रमी 280 अहवाल 'पॉझिटिव्ह'

चोवीस तासात विक्रमी 280 अहवाल ‘पॉझिटिव्ह’

नाशिक । प्रतिनिधी

शहर तसेच जिल्हाभरात करोनाचा उद्रेक सुरूच आहे. आज चोवीस तासात आतापर्यंतचे विक्रमी 280 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

एकट्या नाशिक शहरातील 189 आहेत यामुळे शहरातील रूग्णांची संख्येने 2 हजार 584 झाली आहे. तर जिल्ह्यात करोनाग्रस्तांची एकुण संख्या 4 हजार 864 झाली आहे. पुढील दिवसातच 5 हजाराचा आकडा जिल्हा पार करणार आहे.

आज शहरासह जिल्ह्यातील 13 रूग्णांचा मृत्यू झाल्याने करोना बळींची संख्या 262 झाली आहे. तसेच चोवीस तासात रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार जिल्ह्याभरात आज दिवसभरात एकुण 280 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये शहरातील 189 रूग्ण आहेत. यात शहरातील जुने नाशिकसह आज सर्वाधिक नाशिकरोड परिसरातील अहवाल आहेत.

यामध्ये जेलरोड 5, विहितगाव 8, दत्तमंदिर रोड 7 जगताप मळा 3 तसेच शहरातील गजानन चौक8, 4, देवळाली गाव, चेहडी, पवननगर, जुने नाशिक, पंचवटी पेठरोड, मखमलाबादरोड, वडाळा अशा रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिकशहराचा आकडा 2584 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 75 रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 1074 झाला आहे. यामध्ये सर्वाधिक येवला 25, सिन्नर 14, चांदवड 3, पेठ, देवळा, ननाशी अशा भागात रूग्ण आळले आहे तर शांत झालेल्या मालेगामध्ये 16 रूग्ण पॉझिटिव्ही आले आहेत.

यामुळे मालेगावचा आकडा 1072 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 134 झाला आहे. तर करोनामुळे आज 13 जणांचा मत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा 262 झाला आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यातील आज 153 रूग्णांनी करोनावर मात केली या सर्वांची आज रूग्णालयातून मुक्तता करण्यात आली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 2747 वर पोहचला आहे.

नव्याने दाखल झालेल्या संशयित रूग्णांची संख्या 650 आहे. यामध्ये नाशिक शहरातील 418 आहेत. जिल्हा रूग्णालय 19, ग्रामिण 178, मालेगाव 11, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय 6, गृहविलगीकरण 16 रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आतापर्यंत 23 हजार 266 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील 17 हजार 812 निगेटिव्ह आले आहेत. 4 हजार 864 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 1765 उपचार घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

एकूण कोरोना बाधित: 4864

नाशिक : 2584

मालेगाव : 1072

उर्वरित जिल्हा : 1074

बाह्य : 134

एकूण मृत्यू: 262

करोनामुक्त : 2747

- Advertisment -

ताज्या बातम्या