शिक्षण वंचितांपर्यंत मुक्त विद्यापीठाने पोहचवली ज्ञानगंगा : राज्यपाल

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २७ वा दीक्षांत सोहळा
शिक्षण वंचितांपर्यंत मुक्त विद्यापीठाने पोहचवली ज्ञानगंगा : राज्यपाल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिक्षणापासून (Education) दूर असणाऱ्या समाज घटकांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविण्याचे महत्वाचे कार्य यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (YCMOU) केले आहे. मुक्त व दूरस्थ शिक्षण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केले....

आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २७ व्या दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते.

याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि कृषी वित्तीय महामंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. चारुदत्त मायी, विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्य तथा आमदार सरोज आहिरे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परिक्षा नियंत्रक भटु पाटील, व्यवस्थापन मंडळ सदस्य, विद्वत परिषद सदस्य, नियोजन मंडळ सदस्य यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक उपस्थित होते.

यावेळी बोलतांना राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, भारतात शिक्षणाची व ज्ञानाची परंपरा मोठी आहे. समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहचविण्याचे कार्य मुक्त व दूर शिक्षणामुळेच होवू शकते. ज्या काळी पुस्तके, ग्रंथ नव्हते त्या काळी मौखिक परंपरेतून ज्ञानाचा प्रसार होत गेला.

मुक्त विद्यापीठ वेगळ्या पद्धतीने हीच थोर परंपरा दूरस्थ शिक्षण प्रणालीद्वारे प्रभावीपणे राबवत आहे. मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले विद्यार्थीच विद्यापीठाच्या कार्याचे प्रसारक आणि प्रचारक आहेत. त्यातून केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश विदेशापर्यंत विद्यापीठाचा नावलौकिक वाढत जावा, अशी अपेक्षाही राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या नावाने अध्यासने सुरू करावित : उदय सामंत

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (YCMOU) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि राजर्षी शाहू महाराज (Shahu Maharaj) यांचा आदर्श व योगदान लक्षात घेवून या महापुरुषांच्या नावाने अध्यासने सुरु करावित. या अध्यासनाच्या माध्यमातून महापुरूषांचे चरित्र व विचार विद्यार्थ्यांमार्फत समाजात पोहोचविण्यासाठी व रुजवण्यासाठी मदत होईल, असेही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले.

ते म्हणाले की, आपले हे विद्यापीठ केवळ महाराष्ट्रापूरते मर्यादित न राहता ते राज्याबाहेरही जायला हवे. एवढेच नव्हे तर देशाच्या परिसीमा ओलांडून हे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय व्हायला हवे. तसेच मुक्त व दुरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थांचा विकास होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत यांनी दिली आहे.

प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. चारूदत्त मायी म्हणाले की, दूरस्थ शिक्षणात जास्तीतजास्त कुशल शिक्षकांची आवश्यकता आहे, दूरस्थ शिक्षण पद्धतीमध्ये ई- अभ्यासक्रम, ई- प्रशिक्षण आणि अध्यापनाची गरज आहे, भविष्यात दूरस्थ शिक्षण अधिक प्रभावी शिक्षण पद्धती ठरणार आहे.

कुलगुरू डॉ. पाटील यांनी आपल्या भाषणांत त्यांनी गेल्या वर्षभरातील विद्यापीठाचा कामकाजाचा व प्रगतीचा आढावा सादर करताना विद्यापीठाला मिळालेली नॅकची अ श्रेणी, कोरोना काळानंतरची आव्हाने, ऑनलाईन शिक्षणप्रणाली, विविध नवीन शिक्षणक्रम, परीक्षा पद्धतीतील तंत्रज्ञान यासह विविध विषयांचा परामर्श घेतला.

यावेळी विद्यापीठातर्फे सुमारे १ लाख ३४ हजार विद्यार्थ्यांना पदवी, १४ हजार पदव्युत्तर पदवी, सुमारे २८ हजार पदविका, १५० पदव्युत्तर पदविका तर १३ विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती पदवी जाहीर करण्यात आली.

तत्पूर्वी सकाळी विद्यापीठ प्रांगणातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर प्रमुख अतिथी उदय सामंत, डॉ. चारुदत्त मायी, कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, विद्यापीठच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, विद्वत परिषदेचे सदस्य, नियोजन मंडळ सदस्यांचे तुतारी व सनईच्या स्वरात मिरवणुकीने मुख्य व्यासपीठाजवळ आगमन झाले.

परीक्षा नियंत्रक बी.पी. पाटील यांनी मानदंडसह या मिरवणुकीचे नेतृत्व केले. मिरवणूक व्यासपीठावर येताच ‘ज्ञानगंगा घरोघरी’ या विद्यापीठ बोधचिन्हाची धून वाजविण्यात आली.

सरस्वती वंदना व विद्यापीठ गीताने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. प्रमुख अतिथीच्या हस्ते विद्याशाखानिहाय विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

व्यासपीठावर उदित शेठ, अनिल कुलकर्णी, प्राचार्य ज्ञानदेव नाठे, डॉ महेंद्र लामा, डॉ. जयदीप निकम, डॉ. कविता साळुंके, डॉ. प्रवीण घोडेस्वार, प्रा. डॉ. प्रकाश देशमुख, प्रा.डॉ. माधुरी सोनवणे, डॉ. सुनंदा मोरे, डॉ. प्रमोद खंदारे, यासह विविध विद्याशाखांचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमनाथ सोनवणे, शुभांगी पाटील व माधुरी खर्जुल यांनी केले.

ही आहेत विद्याशाखानिहाय सुवर्णपदके व विविध पारितोषिके प्राप्त विद्यार्थी

मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा सुवर्णपदके व पारितोषिके:

 • धोरण संदीप साहेबराव - कला निष्णात ( एम.ए) परीक्षेत प्रथम क्रमांक : कुलपती सुवर्णपदक

 • आंबुलकर भाऊसाहेब रावसाहेब (कला स्नातक, बी.ए परीक्षेत प्रथम) : यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक , अहिल्याबाई होळकर पारितोषिक, सौ. हेमलता फडके व डॉ. भालचंद्र फडके पारितोषिक, लक्ष्मीबाई पाटील पारितोषिक

 • काटकर उषा ज्ञानेश्वर : कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत महिला विद्यार्थ्यांत प्रथम क्रमांक - सावित्रीबाई फुले पारितोषिक, गोपाळराव मुरलीधर पंडित पारितोषिक, भीमाबाई आंबेडकर पारितोषिक

 • चव्हाण ऋषिकेश अविनाश - कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत द्वितीय क्रमांक : अहिल्याबाई होळकर पारितोषिक

 • राठोड पल्लवी पंडित - कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत महिला विद्यार्थ्यांत द्वितीय क्रमांक : सावित्रीबाई फुले पारितोषिक

 • भांदिर्गे अतुल दत्तात्रय - ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी (बी.लिब.) परीक्षेत प्रथम क्रमांक : यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक, डॉ. शां. ग. महाजन पारितोषिक

 • कोंडेकर अजय सदानंद - बी.ए. (वृत्तपत्रविद्या) प्रथम क्रमांक : ब्ल्यू बर्ड (इं) लि. सुवर्णपदक

 • मुरूमकर रोहिणी हरिभाऊ - कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत मराठी विषयात प्रथम क्रमांक : कै. गोपाळराव मुरलीधर पंडित पारितोषिक, भीमाबाई आंबेडकर पारितोषिक

 • गिते मनीषा दशरथ - कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत मानसशास्त्र विषयात प्रथम क्रमांक : कै. वंदना वसंत पुरोहित पारितोषिक, वेणूताई चव्हाण पारितोषिक

 • पाटील वृषाली रविकांत - कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत राज्यशास्त्र विषयात प्रथम क्रमांक : लक्ष्मीबाई पाटील पारितोषिक , वेणूताई चव्हाण पारितोषिक

 • वीरकर संध्या गजानन - कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत इतिहास विषयात प्रथम क्रमांक : वेणूताई चव्हाण पारितोषिक

 • शिवणकर सागर विनायक - कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत वाङ्मय प्रकार कथा-कादंबरी यात प्रथम क्रमांक : कै. कविता मेहेंदळे पारितोषिक

 • तांबेकर शुभम मधुकर - कला स्नातक (बी.ए.) परीक्षेत प्रबोधनपर साहित्य यात प्रथम क्रमांक : मुरलीधर वडनेरे पारितोषिक

 • पाटील माधवी केतन - ग्रंथालयशास्त्र निष्णात (एम.लिब.) परीक्षेत प्रथम क्रमांक: शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे पारितोषिक

वृत्तपत्रविद्या पदविका परीक्षेत प्रथम क्रमांकासाठीचे दादासाहेब पोतनीस पारितोषिक खालील विद्यार्थ्यांमध्ये विभागून देण्यात आले.

खरात मायकल जॉन, लेंगरे गणेश विलास, पानसरे विकास मारुती, दुधाळे राहुल भरमू, गुरव हर्षद विजयकुमार, माळी सारिका प्रफुल्ल, राऊत वृषाली विजय

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा

 • हरगुनाणी रोशनी अनुप - एम. कॉम. परीक्षेत प्रथम क्रमांक ● यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक

 • खंडागळे अमोल मधुकर - एम.बी.ए. परीक्षेत प्रथम क्रमांक : यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक, कै. भाऊसाहेब हिरे पारितोषिक डॉ. चिंतामणराव देशमुख पारितोषिक

 • वेरुळकर वृषाली महादेव - वाणिज्य स्नातक (बी.कॉम.) परीक्षेत प्रथम क्रमांक : यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक पंडिता रमाबाई पारितोषिक, मोहनलालजी डागा सत्कारनिधी पारितोषिक, श्रीमती शारदाबाई पवार पारितोषिक

 • कुलकर्णी शुभम संजय - वाणिज्य स्नातक (बी.कॉम.) परीक्षेत द्वितीय क्रमांक : पंडिता रमाबाई पारितोषिक

 • मोहिते तृप्ती मारुती - वाणिज्य स्नातक (बी.कॉम.) परीक्षेत महिला विद्यार्थ्यांत द्वितीय क्रमांक : श्रीमती शारदाबाई पवार पारितोषिक

शिक्षणशास्त्र विद्याशाखा

 • सावंत काळबा तुकाराम - शिक्षणशास्त्र स्नातक (बी.एड.) परीक्षेत प्रथम क्रमांक: ब्ल्यू बर्ड (इं) लिमिटेड सुवर्णपदक महर्षी धोंडो केशव कर्वे पारितोषिक, कै. शिवाजीराव सोनार पारितोषिक

 • परतवाघ विद्या अर्जुनराव - शिक्षणशास्त्र स्नातक (बी.एड.) परीक्षेत द्वितीय क्रमांक : महर्षी धोंडो केशव कर्वे पारितोषिक

कृषिविज्ञान विद्याशाखा

 • शेख अमीर सिराज- 'कृषिविज्ञान आणि उद्यानविद्या स्नातक (बी. एस्सी. अॅग्रीकल्चर /हॉर्टिकल्चर) परीक्षेत प्रथम क्रमांक : यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक

 • वायाळ शारदा - 'कृषिविज्ञान आणि उद्यानविद्या स्नातक (बी.एस्सी. हॉर्टिकल्चर)' परीक्षेत प्रथम क्रमांक : डॉ. पंजाबराव देशमुख पारितोषिक व दादासाहेब पोतनीस पारितोषिक

 • जाधव नरेंद्र भाऊसाहेब - फळबागा उत्पादन पदविका (डिप्लोमा इन फ्रूट प्रॉडक्शन) या परीक्षेत प्रथम क्रमांक : डॉ. पंजाबराव देशमुख पारितोषिक

 • शेवाळे नयना हनुमंत - भाजीपाला उत्पादन पदविका (डिप्लोमा इन व्हेजिटेबल प्रॉडक्शन) ह्या परीक्षेत प्रथम क्रमांक : डॉ. पंजाबराव देशमुख पारितोषिक

 • खातोडे रामनाथ रंगनाथ - फुलशेती व प्रांगण उद्यान पदविका ( डिप्लोमा इन फ्लोरिकल्चर अँड लँडस्केप गार्डनिंग) ह्या परीक्षेत प्रथम क्रमांक : पद्मसुला काकड शुभम आनंदराव - कृषि व्यवसाय व्यवस्थापन पदविका (डिप्लोमा इन अॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट) ह्या परीक्षेत प्रथम क्रमांक : प्रा. का. य. सोनवणे स्मृति-पारितोषिक

 • गिरे अपेक्षा संतोष - कृषि-व्यवसाय व्यवस्थापन पदविका (डिप्लोमा इन अॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट) परीक्षेत द्वितीय क्रमांक : प्रा. का. य. सोनवणे स्मृति पारितोषिक

निरंतर शिक्षण विद्याशाखा

 • म्हात्रे साक्षी चंद्रकांत - बी.एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज अँड केटरिंग सर्व्हिसेस' परीक्षेत प्रथम क्रमांक : यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक

 • मिस्त्री दानेश बेहराम- 'बी. एस्सी. इन हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट' परीक्षेत प्रथम क्रमांक : यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक

संगणकशास्त्र विद्याशाखा

 • गवळी करिश्मा दिलीप - 'बी. सी. ए.' परीक्षेत प्रथम क्रमांक : यशवंतराव चव्हाण सुवर्णपदक

‘ज्ञानगंगा घरोघरी’ ओळ ब्रीदवाक्य सार्थ करत विद्यापीठाने समाजातील विविध घटकांना पदवी प्रदान करण्याची परंपरा कायम राखली. या पदवीदान सोहळ्यात अंध पदवीधर चार, लष्करातील जवान ६८, जेष्ठ नागरीक १९२, पोलीस कर्मचारी ७७, कारागृहातील बंदीजन १५ तर नक्षलग्रस्त भागातील नऊ विद्यार्थांनी पदवी प्राप्त केली आहे. या वर्षी विविध शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या एकूण १,७६,११३ विद्यार्थांपैकी २० वर्षापेक्षा कमी वयोगटातील ७४०, २० ते ३९ वयोगटातील १,५५,६८८, ४० ते ५९ वयोगटातील १९,४९३ तर ६० पेक्षा अधिक वर्षे वय असणारे १९२ विद्यार्थी होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com