आसाममध्ये पावसाचा हाहाकार; २५ जणांचा मृत्यू

आसाममध्ये पावसाचा हाहाकार; २५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । New Delhi

अखंड कोसळणाऱ्या पावसामुळे (monsoon) आसाममधील (Assam) पूरस्थिती गंभीर झाली असून आसामधील २८ जिल्ह्यांतील तब्बल १९ लाख नागरिकांना या महापुराचा फटका बसला आहे. या पुरामुळे (Flood) आसाममध्ये आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू (death) झाला आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा होजाई जिल्ह्यातील (Hojai district) २४ पूरग्रस्त प्रवाशांना इस्लामपूर गावातून (Islampur village) एक नाव घेऊन जात होती. त्यावेळी ही नाव रायकोटा (Raikota) परिसरात आल्यावर एका विटभट्टीजवळ अचानक उलटल्याने गोंधळ उडाला. त्यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफ जवानांनी २१ जणांना पाण्यातून वाचवले असून तीन बेपत्ता मुलांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, आसाम पोलिसांच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांसह निमलष्करी दलांनी बचाव आणि मदतकार्य सुरू केले असून पुराचा शेकडो घरांवर वाईट परिणाम झाला आहे. तसेच अनेक रस्ते (road) पूल (brige) आणि कालवे (canals) यांचे नुकसान झाले असून अनेक बंधारे (Dams) फुटले आहेत. तर ब्रह्मपुत्रा, बेकी, मानस, पगलाडिया, पुथिमारी, कोपिली आणि जिया-भराली नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com