Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यातीन दिवसांत Telegram ला मिळाले अडीच कोटी नवे युजर

तीन दिवसांत Telegram ला मिळाले अडीच कोटी नवे युजर

नवी दिल्ली

WhatsApp ने आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवरुन प्रचंड गदारोळ सुरू आहे. आता Telegram व Signal अ‍ॅप वेगाने वाढत आहे. तीन दिवसांत २ कोटी ५० लाख लोकांनी टेलिग्राम डाऊनलोड केल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन प्रायव्हसी पॉलिसीचा विरोध सुरू आहे. यामुळे अनेक युजर्स सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या अ‍ॅपकडे वळले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय म्हणून टेलिग्राम व सिग्नलकडे वापरकर्ते वळले आहे. मागील ७२ तासांत २ कोटी ५० लाख लोकांनी टेलिग्राम डाऊनलोड केले आहे. आता टेलिग्राम वारणाऱ्यांची संख्या ५० कोटींपेक्षा जास्त झाल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. कंपनीचे सीईओ पाेवल ड्यूरो यांनी सांगितले की, आशियात ३८ टक्के तर युरोपमध्ये २७ टक्के युजर वाढले आहे. लोकांना मोफत दिल्यानंतर ते आपल्या प्राइवेसीशी तडजोड करत नाही, अशी टीका ड्यूरो यांनी WhatsApp चे नाव न घेता केली,

- Advertisment -

ताज्या बातम्या