पैशांसाठी तगादा लावल्याने २४ वर्षीय युवकाने गळफास घेत संपवले जीवन

देवळा | प्रतिनिधी | Deola

येथील एका चोवीस वर्षीय युवकाने (Youth) हात उसनवारीने घेतलेले पैसे परत करावेत असा तगादा लावल्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी देवळा पोलिसांनी (Deola Police) दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकास अटक (Arrested) करण्यात आली आहे तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे…

नाशकात रंगपंचमीचा उत्साह; पाहा फोटो

हर्षल संजय गायकवाड (वय २४) रा.विद्यानगर, देवळा असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून याबाबत देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय हरी गायकवाड रा. विद्यानगर, देवळा यांनी प्रवीण सदाशिव आहेर रा. तीसगावं ता. देवळा व अमोल निकम रा. दाभाडी ता. मालेगांव यांच्याकडून २१ लाख रुपये हात उसनवारावर घेतले आहेत.

लखमापूर येथे युवकाची आत्महत्या

त्यापोटी फिर्यादी यांनी वरील आरोपींना (Accused) तीन धनादेश दिले आहेत. हे धनादेश खात्यावर पैसे नसल्याने वटले नाहीत.यामुळे त्यांनी फिर्यादीचा मुलगा हर्षल संजय गायकवाड(२४) रा. विद्यानगर देवळा याला प्रत्यक्ष भेटून व मोबाईलवर वारंवार धमकी देत होते. या त्रासाला कंटाळून हर्षल याने शनिवारी (दि.११) रोजी दुपारच्या सुमारास राहत्या घरी कोणी नसतांना गळफास घेत आत्महत्या केली.

नाशिककरांनी लुटला रंगपंचमीचा आनंद; पाहा व्हिडीओ

दरम्यान, याप्रकरणी देवळा पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्री उशिरा प्रवीण आहेर यास अटक केली. तर दुसऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच घटनास्थळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी भेट देऊन पाहणी केली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *