शहरातील २४ पोलीस करोना पॉझिटिव्ह
मुख्य बातम्या

शहरातील २४ पोलीस करोना पॉझिटिव्ह

एक शहिद, आयुक्तांचा उपाययोजनांवर भर

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात करोनाचा उद्रेक झाला असून अद्यापपर्यंत करोनापासून दुर राहिलेल्या शहर पोलिसांना संसर्स सुरु झाला आहे. शहरातील ३१ पोलीस करोना संशयित म्हणुन दाखल झाले होते. यापैकी २४ पोलीस अधिकारी व सेवक पॉझिटिव्ह आले आहेत. तर इंदिरानगर येथील एक सेवक शहिद झाला आहे. यामुळे ग्रामीण पोलीस दलानंतर आता शहर पोलीसही करोनाच्या विळख्यात येत असल्याचे चित्र आहे.

शहर पोलिस दलातील १२ करोनाबाधित पोलिसांवर सध्या विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आतापर्यंत २४ जणांना करोनाची लागण झाली असून, एक करोना योद्धा शहीद झाले आहेत.

शहर पोलिस दलात ग्रामीण पोलीस दलाच्या तुलनेत करोनाचा संसर्ग कमी असला तरी आतापर्यंत ३२ संशयित सापडले आहेत. त्यापैकी २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील १२ जणांवर सध्या आडगाव येथील मेडीकल कॉलेजसह खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

यात संशयित तसेचपॉझिटिव्ह आढळून येण्यात इंदिरानगर आणि क्राईम ब्रँचच्या युनिट दोनने आघाडी घेतली आहे. येथे अनुक्रमे सात आणि सहा व्यक्ती संशयित वा पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. यापाठोपाठ, पंचवटी, भद्रकाली, देवळाली कँम्प, उपनगर, नाशिकरोड, वाहतूक शाखा, मुंबईनाका, मुख्यालय आदी ठिकाणी एक-दोन संशयित तसेच पॉझिटिव्ह पोलिस सेवक आढळून आलेत.

शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याने कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी कायम कार्यरत रहावे लागत आहे. समन्स तसेच वारंट बजावण्याचे कर्तव्य पोलिसांना पार पाडावे लागले. त्यातून करोनाचा संसर्ग थोडाफार वाढला. मात्र, आजही इतर शहराच्या तुलनेत शहर पोलिस दलात करोना संसर्गाचे प्रमाण फारच कमी आहे.

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सुरुवातीपासूनच यासाठी पुढाकार घेतला. औषधांसह, गरम पाण्याची सुविधा, गोकी घड्याळ, पुरेशी विश्रांतीची काळजी अशा अनेक घटकांवर काम करण्यात आले. त्याचा चांगला परिणाम असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शहरात करोनाचा प्रसार वाढला असला तरी पोलिसांचे काम थांबलेले नाही. गुन्हेगारांना पकडणे असो की वाहतूक नियोजन, कोर्ट, तपास आदी कामे होत आहे. यात पोलिसांचा सर्वच स्थरातील नागरिकांशी संबंध येतो. इंदिरानगर पोलिसांना वडाळा व त्याला लागून असलेला भाग हॉटस्पॉट होता.यामुळे या पोलीस ठाण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत. परंतु इतरांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. सेवकांना करोना मुक्त ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाचे पूर्ण प्रयत्न आहेत.

पौर्णिमा चौगुले. पोलिस उपायुक्त

अशी आकडेवारी

एकूण दाखल- ३१

पॉझीटीव्ह- २४

करोनामुक्त- १८

उपचार सुरु असलेले- १२

मृत्यू- १

निगेटीव्ह- ७

Deshdoot
www.deshdoot.com