Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याभूस्खलनात १८ जवानांसह २४ जण मृत्युमुखी

भूस्खलनात १८ जवानांसह २४ जण मृत्युमुखी

नवी दिल्ली | New Delhi

मणिपूरमधील (Manipur) नोनी जिल्ह्यात (Noni district) रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी बुधवारी (२९) भूस्खलनाची (Landslide) दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली काही जवान अडकलले होते. त्यावेळी या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या दुर्घटनेतील मृतांची संख्या अजूनही वाढत असून ही संख्या आजपर्यंत २४ वर पोहोचली आहे. यामध्ये टेरिटोरियल आर्मीच्या (Territorial Army) १८ जवानांचा समावेश आहे…

- Advertisement -

याबाबत एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या दुर्घटनेतील अद्याप ३८ लोक बेपत्ता असून मदत आणि बचाव कार्याला (Relief and rescue work) गती देण्यासाठी आणखी काही पथके तैनात करण्यात आली आहेत. तर लष्कर, आसाम रायफल्स, टेरिटोरियल आर्मी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान (NDRF and SDRF army) ढिगाऱ्याखाली जीव शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी वॉल रडारचा वापर केला जात आहे. याशिवाय स्निफर डॉगचे पथकही तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत १३ टेरिटोरियल आर्मीचे जवान आणि ५ नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर १८ टेरिटोरियल आर्मीचे जवान आणि ६ नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर प्रादेशिक लष्कराचे १२ सैनिक आणि २६ नागरिक अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग (Manipur CM N. Biren Singh) यांनीही शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची माहिती घेतली. तसेच मणिपूरच्या इतिहासातील हा सर्वात भीषण अपघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या