Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअंबड परिसरात २२ वर्षीय विवाहितेचा निर्घृण खून

अंबड परिसरात २२ वर्षीय विवाहितेचा निर्घृण खून

नवीन नाशिक l प्रतिनिधी New Nashik

घरात पत्नीचा मृतदेह पाहून पतीने त्याठिकाणाहून पळ काढत थेट औरंगाबाद गाठून तेथील पोलिसांना याबाबतची माहिती दिली. दरम्यान बावीस वर्ष महीलेचा या प्रकरणात खून झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली….

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलिसांना (दि.२७) रात्री अडीच वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील शहर नियंत्रण कक्षातून फोन आला व वरचे चुंचाळे येथील दत्तनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती दिली ही माहिती मिळताच उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलिस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीकांत निंबाळकर, सपोनि गणेश शिंदे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी या ठिकाणी औरंगाबाद येथील वाळुंज औद्योगिक वसाहतीत राहणारी संगीता सचिन पवार(२२) हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला दरम्यान संगीता हिचा गळा चिरून खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

यावरून पोलिसांचे तपास चक्र फिरले तसेच अंबड पोलिस ठाण्याचे एक पथक औरंगाबादच्या दिशेने मृत महिला संगीताच्या पतीकडे विचारपूस करण्यासाठी रवाना झाले.

संगीता व तिचा पती त्यांच्या मुलासह गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वीच चुंचाळे येथे राहायला आले होते. दरम्यान तिचा पती हा पेंटिंग व्यवसाय करत असल्याची नोंद त्यांनी घर मालकाला दिली होती.

हा प्रकार खुनाचा असला तरी अद्यापपर्यंत हा खून कोणी केला याबाबत पोलिसांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे, मात्र सदरहू खून हा चारित्र्याच्या संशयावरून झाला का व संगीताचा खून करणारा हा तिचा पती आहे का? या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या