दुगारवाडी धबधबा परिसरात अडकलेले 22 पर्यटक सुखरूप; एक वाहून गेला, मध्यरात्री मोहीम फत्ते

दुगारवाडी धबधबा परिसरात अडकलेले 22 पर्यटक सुखरूप; एक वाहून गेला, मध्यरात्री मोहीम फत्ते

त्र्यंबकेश्वर l प्रतिनिधी Trimbakeshwar

रविवारच्या सुट्टीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर परिसरातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यास गेलेले २३ तरुण दुगारवाडी धबधबा परिसरात अडकले होते. मध्यरात्री बचाव मोहीम राबवत २२ तरुणांना वाचविण्यात यश आले. एक जण वाहून गेल्याची माहिती मिळत आहे....

काल (दि ०७) रोजी काही पर्यटक दुगारवाडी परिसरात धबधबा (Dugarwadi waterfall) पाहण्यासाठी गेले होते. सायंकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. यामुळे हे पर्यटक धबधब्यानजीकच अडकले.

पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच मध्यरात्री बचाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, नाशिक क्लाइंबर अँड रेस्क्यू असोसिएशन, वन विभाग, महसूल व पोलीस प्रशासन यांच्या खडतर प्रयत्नानंतर मध्यरात्री दीड वाजता या पर्यटकांना सुखरूप वाचवण्यात आले. (Rescue Operation)

बचाव कार्याकरीता रेड्डी उपवनसंरक्षक नाशिक, माधुरी कांगणे,अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण, तेजस चव्हाण, उपविभागीय अधिकारी, इगतपुरी, फडतरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, दीपक गिरासे, तहसिलदार त्र्यंबकेश्वर, रणदिवे, पोलीस निरीक्षक, त्रंबकेश्वर शहर पोलीस स्टेशन, स्वप्निल सोनवणे नायब तहसीलदार त्र्यंबकेश्वर, पवार, वन परिक्षेत्र अधिकारी, हेमंत कुलकर्णी मंडळ अधिकारी, जाधव मंडळ अधिकारी व तलाठी तसेच मोरे, बचाव पथक कर्मचारी व मार्गदर्शक अधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मध्यरात्री दीड वाजता बचाव मोहीम यशस्वी झाली.व

स्थानिक 5 पर्यटक अगोदर बाहेर परतलेले होते. त्यांच्या माध्यमातून पर्यटक अडकल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली होती. तसेच अविनाश गरड,रा.आंबेजोगाई, जि-बीड असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव असून सकाळी पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com