Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याएक दोन नाही तब्बल २२ तास लोड शेडींग

एक दोन नाही तब्बल २२ तास लोड शेडींग

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील दारणा धरणातून (Darana Dam) नदी (Rivers) व कालव्यावरील (Canal) पाणी पुरवठा (Water Supply) योजनांसाठी पाण्याचे आवर्तन 16 ते 31 मे 2022 या कालावधीत सोडण्यात येणार आहे….

- Advertisement -

सिन्नर व निफाड तालुक्यातील ज्या गावांमधुन या आवर्तनातील पाण्याचा प्रवाह जाणार आहे, त्या गावांचा वीजपुरवठा सकाळी 6.00 ते 8.00 ही वेळ वगळता खंडीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे.

ते म्हणाले की, निफाड तालुक्यातील मौजे खानगांव, तारूखेडले, तामसवाडी करंजी तसेच सिन्नर तालुक्यातील मौजे चोंढी, मेंडी, सांगवी, सोमठाण, दहिवाडी, उजनी, शहा, कारवाडी, विघनवाडी, पुतळेवाडी, पाथरे बुद्रूक, पाथरे खुर्द, कोळगाव माळ इत्यादी गावांसाठी आवर्तन कालावधीत सकाळी 06.00 ते 08.00 ही वेळ वगळता दररोज 22 तास वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.

या आवर्तन कालावधीत दारणा धरणातून नदी व कालव्यावरील पाणी पुरवठा योजनांसाठी बिगर सिंचनाकरिता 600 दशलक्ष घन फुट व सिंचनासाठी 250 दशलक्ष घन फुट असे एकुण 850 दशलक्ष घन फुट पाणी सोडण्यात येणार आहे.

या आवर्तनातील पाणी नियमानुसार सोडण्यात येवून हे पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची राहणार असून नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या