Saturday, May 4, 2024
Homeनाशिकआत्महत्याग्रस्त 22 शेतकरी कुटुंब मदतीस पात्र

आत्महत्याग्रस्त 22 शेतकरी कुटुंब मदतीस पात्र

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्ह्यात चालू वर्षभरात जानेवारी महिन्यापासून कर्जबाजारी व वैयक्तिक कारणांमुळे 33 शेतकर्‍यांनी आत्महत्या करत जीवन संपवले. त्यातील 22 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना 1 लाख रुपयांची शासकीय मदत मिळाली आहे. तर 11 शेतकरी आत्महत्या प्रकरणे मदतीसाठी नामंजूर ठरली आहे.

- Advertisement -

करोना संकटाशी दोन हात करणार्या जिल्हा प्रशासनाला शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी झाल्याने काहिसा दिलासा मिळाला आहे. मागील 11 महिन्यात 33 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

जिल्हयातील सर्वाधिक सधन तालुका अशी ओळख असलेल्या निफाडमध्ये सर्वाधिक 9 शेतकर्‍यांनी तर बागलाणमध्ये 5 जणांनी आत्महत्या केली आहे. करोनाच्या कालावधीत कृषीसह सर्वच क्षेत्रांना फटका बसला. शेतकऱीही त्यात पिचून निघाला. कृषीमाल, कृषी बाजार समित्यांना परवानगी असातनाही सुरुवातीला कृषीमालासह अनेक बाबींच्या वितरणासही अडचणी आल्या.

यातून अनेक शेतकर्‍यांचे माल बाजारपेठेत जाऊ शकले नाही. त्याला भावही मिळाला नाही. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍यांची मोठी अडचण झाली. या सार्‍यांचा शेतकर्‍यांवर मोठा परिणाम होत, कर्जबाजारी पणामुळे काही शेतकर्‍यांनी थेट आपले जीवन संपिवण्याचा मार्ग स्विकारला.

जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांच्या कालावधीत 33 जणांनी आत्महत्या केली आहे. 22 जणांना शासकीय मदत मिळाली असून, 11 जणांची प्रकरणे जिल्हा समितीने नामंजूर केली आहे.

या 11 प्रकरणांतील शेतकर्‍यांनी वैयक्तिक कारणाने आत्महत्या केल्यानेच त्यांना मदत नाकारली आहे. दरम्यान, आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टास्क फोर्स तयार केली असुन त्यामुळे शेतकरी आत्महत्या प्रकरणात कमी झालेली आहे.

तालुकानिहाय आत्महत्या

बागलाण -5, निफाड-9, मालेगाव -1, कळवण-2, त्र्यंबकेश्वर -3, नाशिक -3, पेठ-1, दिंडोरी -5, सिन्नर -3, चांदवड -1

- Advertisment -

ताज्या बातम्या