Monday, April 29, 2024
Homeनाशिकधक्कादायक! एमपीएमध्ये आढळले २२ करोनाबाधित

धक्कादायक! एमपीएमध्ये आढळले २२ करोनाबाधित

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र पोलीस अकादमीत (Maharshtra Police Academy) २२ प्रशिक्षणार्थींना करोनाची (Corona) बाधा झाली आहे. बाधितांवर महापालिकेच्या बिटको रुग्णालयात (bytco Hospital) उपचार करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

दिवाळीच्या (Diwali) सुटीत गावी गेलेल्या प्रशिक्षणार्थींची अकादमीमध्ये चाचणी करण्यात आली होती. त्यात हे बाधित आढळून आले आहेत. महाराष्ट्र संयुक्त सेवा परिक्षेच्या माध्यमातून पोलीस उपअधीक्षक व उपनिरीक्षक पदासाठी निवड झालेल्या राज्यभरातील उमेदवारांना महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण दिले जाते.

दिवाळीनिमित्त प्रशिक्षणार्थींना सात दिवसांची सुटी देण्यात आली होती. त्यामुळे प्रशिक्षणार्थी गावी गेले होते. सुटी संपल्याने ते अकादमीमध्ये परतले. गावाहून परतलेल्या प्रशिक्षणार्थींची महापालिकेच्या सहकार्याने करोना चाचणी (Corona Test) करण्यात आली.

तीन दिवसांत तीन महिला प्रशिक्षणार्थींसह २२ जणांना बाधा (Corona Positive) झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये ८८७ प्रशिक्षणार्थींची बॅच असून या सर्वांचे लसीकरण झाले आहे. बाधितांना त्रास जाणवत नसला तरी खबरदारी म्हणून त्यांना बिटकोमध्ये दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या