
दिल्ली | Delhi
नोबेल पारितोषिक समितीनं यावर्षीचा अर्थशास्त्रातील पुरस्कार जाहीर केला असून अमेरिकी शास्त्रज्ञ क्लॉडिया गोल्डीन यांना महिलांच्या श्रम बाजारातील सहभागाच्या परिणामांबद्दल समाजाचं आकलन वृद्धिंगत केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.
गोल्डीन या हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राच्या हेनरी ली अध्यासनाच्या प्राध्यापिका आहेत. गोल्डीन यांनी त्यांच्या संशोधनात श्रमबळात महिला कामगारांचा सहभाग, उत्पन्नात लिंगानुसार येणारं अंतर, उत्पन्नातील असमानता, तांत्रिक बदल, शिक्षण आणि कामासाठी स्थलांतर या विषयांवर प्रकाश टाकला. त्यांनी संशोधन करताना वर्तमानाचा उलगडा करण्यासाठी ऐतिहासिक दृष्टिकोनाचा वापर केला आहे.