Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याधक्कादायक! जगातल्या २० प्रदुषित शहरांमध्ये महाराष्ट्रासह भारतातल्या 'या' शहरांचा समावेश

धक्कादायक! जगातल्या २० प्रदुषित शहरांमध्ये महाराष्ट्रासह भारतातल्या ‘या’ शहरांचा समावेश

मुंबई | Mumbai

World Of Statistics च्या अहवालानुसार जगातील सर्वांत जास्त हवा प्रदूषण असणाऱ्या २० शहरांपैकी भारतातील तब्बल १४ शहरांचा सामावेश आहे. हा भारतासाठी इशारा आहे.

- Advertisement -

दरम्यान, World Of Statistics या संस्थेने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ही यादी प्रसिद्ध केली असून महाराष्ट्रातील भिवंडी या शहराचा यामध्ये सामावेश आहे. त्यानंतर दिल्ली या शहराचा सामावेश या यादीमध्ये आहे. हवा प्रदूषणामध्ये पहिल्या वीस शहरांमध्ये पाकिस्तानातील लाहौर या शहराचा पहिला क्रमांक लागतो तर चीनमधील होटन या शहराचा दुसरा क्रमांक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील भिवंडी आणि दिल्ली हे दोन शहरे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

तर, देशात राहण्यासाठी सर्वांत चांगले शहर म्हणून पुणे घोषित करण्यात आले आहे. कारखाने, वाहनांमधून निघणारा धूर आणि बदलत्या वातावरणामुळे हवा प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

1. लाहोर, पाकिस्तान: 97.4

2. होटन, चीन: 94.3

3. भिवंडी, भारत: 92.7

4. दिल्ली: 92.6

५. पेशावर: 91.8

6. दरभंगा: 90.3

7. असोपूर: 90.2

8. एन’जामेना, चाड: 89.7

9. नवी दिल्ली: 89.1

१०. पाटणा: 88.9

11. गाझियाबाद: 88.6

१२. धरुहेरा: 87.8

13. बगदाद, इराक: 86.7

14. छपरा: 85.9

15. मुझफ्फरनगर: 85.5

16. फैसलाबाद: 84.5

17. ग्रेटर नोएडा: 83.2

18. बहादूरगढ: 82.2

19. फरीदाबाद: 79.7

20. मुझफ्फरपूर: 79.2

- Advertisment -

ताज्या बातम्या