Friday, April 26, 2024
Homeजळगावग.स.सोसायटीच्या वार्षिक सभेत : 20 खोके, एकदम ओक्के...

ग.स.सोसायटीच्या वार्षिक सभेत : 20 खोके, एकदम ओक्के…

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

ग.स.सोसायटीची (G.S.Society) 113 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Annual General Meeting) ग.स.सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील (President Uday Patil) यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी 1.30 वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या (Natun Maratha College) मल्टीपर्पज हॉलमध्ये गोंधळातच (confusion) पार पडली. सभेत पटलावरील विषय वाचन सुरु असताना उदय पाटील यांच्या हातून विषय पत्रिका (subject papers) एका सभासदाने (member) स्टेजजवळ येत हिसकावून (Grabbed) घेतली. त्यानंतर काही सभासदांनी (members) घोषणाबाजी करीत सभासद स्टेजवर चढल्याने व्यासपीठावर एकच गोंधळ उडाला. खाली बसलेल्या सभासदांमधून 50 खोके, एकदम ओके, (50 boxes quite ok,) 50 नाही भाऊ, 20 खोके तिन्ही गट ओके, अशी नारेबाजी (sloganeering) केल्याने सत्ताधारी व सभासदांमध्ये आरोपप्रत्यारोप सुरु असताना एका सभासदांची कॉलर पकडल्याने त्यातच गोंधळाची अधिकच भर पडली. त्यामुळे ग.स.सोसायटीची सभा गोंधळात 10 मिनिटात गुंडाळण्यात आली.

- Advertisement -

लोकसहकार गटाच्या काही सभासदांचा गोंधळ; उदय पाटील यांचा आरोप

सभेनंतर पत्रकारांशी संवाद साधतांना अध्यक्ष उदय पाटील म्हणाले की, सत्ताधारी गटासह तिन्ही गटांची युती झाली असून तिन्ही गटाचे सर्वच संचालक एकत्र येऊन सभासदांच्या हितासाठी चांगले निर्णय घेतले. विरोधकांना कोणतेच बोलण्यासारखे मुद्दे नसल्याने ग.स. सोसायटीच्या सभेत लोकसहकार गटाच्या काही सभासदांनी गोंधळ घातला.

गोंधळाची परंपरा कायम असल्याचे मुद्यावर उदय पाटील म्हणाले की, गेल्या पाच निवडणुकीत निवडून आलो आहे. सन 2006 मध्ये ग.स.सोसायटीची सभा शांततेत झाली होती. त्यामुळे गोंधळाची परंपरा म्हणता येणार नाही, असे सांगून उदय पाटील पुढे म्हणाले की, 15 दिवस आधी विषय पत्रिेकेवर हरकत असेल तर विरोध नोंदवा, असे आवाहन केले होते. मात्र,ज्यांनी गोंधळ घातला त्यांनी एक दिवस आधी पत्रकार परिषद घेऊन विरोध जाहीर करायला हवा होता.

प्रशासक मंडळाने यापूर्वीच 6 टक्के लाभांश जाहीर केला आहे. एकदा घेतलेला निर्णय बदलता येत नाही. राष्ट्रगीताच्या अवमानाबद्दल बोलताना त्यांनी सभेत पोलीस बंदोबस्त होता. त्यांच्यासमोर ही वाईट घटना घडली असून त्यांनीच कारवाई करावी, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सभासदांच्या हितासाठी सत्ताधार्‍यांसोबत

या सभेत सत्ताधारी सहकार गटासोबत लोकसहकार गटाचे संचालकांनीदेखील सभासदांच्या हितासाठी एकत्र येवून चांगले निर्णय घेतले. विरोधाला विरोध म्हणून न करता, ज्या चांगल्या गोष्टी आहेत. त्यांना नेहमी सहकार्य राहील. मात्र सत्ताधारी चुकीची कामे करीत असतीलतर त्याला लोकसहकार गटाच्या संचालकांचा विरोध राहणार आहे. असे मत संचालिका प्रतिभा सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. तिन्ही गटांनी एकत्रित येवून सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. त्यामुळे विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. अशी पुष्टीही ते जोडायला विसरले नाही.

अध्यक्षांची खेळी फसली

ग.स.सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांनी सभेच्या पूर्व संध्येलाच सहकार गट, लोकसहकार गट आणि प्रगती शिक्षक सेना गट, या तिन्ही गटाच्या संचालकांची बैठक घेवून सत्ताधारी आणि विरोधक एकाच व्यासपीठावर आले होते. सभेत देखील विद्यमान संचालकांसह आजी-माजी अध्यक्षांसह संचालक व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे ग.स.सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत पार पडले अशी अपेक्षा सर्वांनाच होती.

मात्र, काही सभासदांमधूनच प्रश्नांची सरबत्ती सुरु झाल्याने विषय वाचन सुरु असतांना अध्यक्ष उदय पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु होता. उदय पाटील यांनी खेळी-मेळीच्या वातावरणात सभा पार पडेल असे चित्र निर्माण केले खरे पण, विरोधकांच्या मनाचा अंदाज घेण्यात ते सफशेल अपयशी ठरल्याने त्यांची ही खेळी निष्फळ ठरल्याची चर्चा सभासदांमध्ये चांगलीच रंगली होती.

हे तर सत्ताधारी गटाचे षड्यंत्र

ग. स. सोसायटीची आजची जनरल मीटिंग नियोजित पद्धतीने संपवणे हे सत्ताधारी गटाने केलेले षड्यंत्र आहे. सभासदांनी प्रत्येक विषयावर चर्चा करून निर्णय घेण्याचा आग्रह धरला केला होता. तो सत्ताधारी गटाने मीटिंग संपवून सभासदांचा विश्वास घात केला. सभासद आता जे विषय चुकीचे आहेत. त्याला संचालक मंडळ आणि जिल्हा उपनिबंधक .यांच्याकडे लेखी विरोध करू, अशी प्रतिक्रिया जुनी पेन्शन हक्क संघटन जळगावचे जिल्हा सल्लागार सुगनचंद नाना पाटील यांनी दिली. दरम्यान, सभेत विषय पत्रिकेचे वाचन सुरु असताना ग.स.चे अध्यक्ष उदय पाटील यांनी या गोंधळी वातावरणात सर्व विषय मंजूर करीत अवघ्या 10 मिनिटात सभा गुंडाळली. त्यानंतर राष्ट्रगीत सुरु करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रगीताचाही अवमान झाल्याचे दिसून आले.

राष्ट्रगीताचा अवमान

अध्यक्ष उदय पाटील यांनी प्रास्ताविक मांडल्यानंतर विविध विषयांना मंजुरी देत असतांना 6 व्या विषयांचे वाचन सुरु असताना काही सभासदानी या विषयाला आक्षेप घेत आक्रमक होऊन त्यांनी सभेत घोषणाबाजी करीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मात्र सभासद हे जुमानत नसल्याने संचालक मंडळाने सर्व विषय अवघ्या 10 मिनिटात मंजूर करीत राष्ट्रगीताला प्रारंभ करण्यात आला. मात्र गोंधळाच्या वातावरणात राष्ट्रगीत अपूर्ण म्हटले गेल्याने याठिकाणी राष्टगीताचा अवमान झाला.

यावेळी ग.स.सोसायटीचे उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, संचालक अजबसिंग पाटील, क.नि.समितीचे अध्यक्ष अजय देशमुख, कर्ज समिती अध्यक्ष योगेश इंगळे, ग.स.प्रबोधनी अध्यक्ष मंगेश भोईटे, लोकसहकार गटाचे गटनेता सुनिल सुर्यवंशी, प्रगती शिक्षक सेना गटाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, संचालक भाईदास पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, अनिल गायकवाड, विश्वास पाटील, महेश पाटील, प्रतिभा सुर्वे, रागिणी चव्हाण, अजयराव सोमवंशी, मनोज माळी, विजय पवार, निलेश पाटील, योगेश सनेर, अमरसिंग पवार, राम पवार, जयश्री महाजन, वाल्मीक पाटील यांच्यासह आजी माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

एकीकडे गोंधळ तर दुसरीकडे खरेदीची लगबग

ग.स.सोसायटीची सभा सुरु असतांना सत्ताधारी आणि काही सभासदांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतांना एकाकडे गोंधळ तर दुसरीकडे आपआपला भत्ता घेवून खरेदीचा आनंद लुटण्यात सभासद व्यक्त होते. त्यामुळे नूतन मराठा महाविद्यालय ते कोर्ट चौक परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. या परिसरात खाद्य पदार्थांपासून विविध रेडिमेड वस्तुंची दुकाने दुकानदारांनी सकाळपासूनच थाटली होती. त्यामुळे शहरात लाखोंची उलाढाल झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या