Sunday, April 28, 2024
Homeदेश विदेशलैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल, अटक होणार?

लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल, अटक होणार?

दिल्ली | Delhi

महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर आता भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh)यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यत आला आहे. दिल्लीच्या कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

बृजभूषण सिंह यांच्यावर दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी एक गुन्हा पोक्सो कायद्यांतर्गत तर दुसरा छेडछाडीच्या कलमांतर्गत दाखल करून घेतला आहे. महिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने बृजभूषण शरण सिंहवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सिंह त्यांच्यावर कधीही अटकेची कारवाई होऊ शकते.

मामाचा खून करणार्‍या भाचाला जन्मठेप

गेल्या शुक्रवारी ७ महिला कुस्तीपट्टूंनी तक्रार दिली होती. यात एक कुस्तीपट्टू अल्पवयीन आहे. गुन्हा दाखल न झाल्याने सोमवारी कुस्तीपट्टूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तक्रारीच्या एक आठवड्यानंतर २८ एप्रिलला सॉलिसिटर जनरलनी न्यायायलयात आज गुन्हा दाखल होईल असं म्हटलं होतं. यानंतर दिल्ली पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांखाली दोन गुन्हे नोंद केले.

वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर सुरूच! वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सात महिला अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत . हे सर्व अधिकारी ACP ला रिपोर्ट करतील आणि नंतर ACP – DCP ला रिपोर्ट करतील. एफआयआर नोंदवण्यासाठी नवी दिल्लीतील सुमारे 10 पोलीस अधिकाऱ्यांना ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत दिल्ली पोलिस तपासासाठी परदेशात देखील जाण्याची शक्यता आहे. जिथे पीडित कुस्तीपटूसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. त्याचबरोबर देशातील प्रत्येक राज्यात जिथे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे तिथे पोलीस देखील पोलीस जाण्याची शक्यता आहे. पीडित कुस्तीपटूंच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर असेल.

नगर बाजार समिती निवडणूक मतदाना दरम्यान गोंधळ, भाजपची बस मतदान केंद्रावर आली अन्…. पाहा VIDEO

एफआयआर दाखल करण्यापूर्वी दिल्ली पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पोलिस सर्व पीडित कुस्तीपटूंचे जबाब नोंदवणार आहे. तसेच या प्रकरणी पोलिस संबंधित पुरावे गोळा करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या