Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा 5 हजार 587 वर

नाशिक जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा 5 हजार 587 वर

नाशिक । दि. 6 प्रतिनिधी

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून जिल्ह्यातील विविध नव्या भागातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आज चोवीस तासात जिल्ह्यात 196 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

यात नाशिक शहरातील 132 आहेत यामुळे शहरातील रूग्णांची संख्येने 3 हजार 74 झाली आहे. तर जिल्ह्यात करोनाग्रस्तांची एकुण संख्या 5 हजार 587 झाली आहे. तर एकाच दिवसात जिल्ह्यातून 691 नवे संशयित दाखल झाले आहेत. आज शहरासह जिल्ह्यातील 7 रूग्णांचा मृत्यू झाल्याने करोना बळींची संख्या 284 झाली आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्राप्त अहावालानुसार जिल्ह्याभरात आज दिवसभरात एकुण 196 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये शहरातील 132 रूग्ण आहेत. यात शहरातील हिरावाडी, श्रीरामनगर, पेठरोड, जुने नाशिकसह काठेगल्ली, पंचवटी येथील भगुररोड, नाशिकरोड परिसरातील अधिक अहवाल आहेत. तसेच शहरातील देवळाली गाव, द्वारका, सातपूर, मखमलाबादरोड अशा रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिकशहराचा आकडा 3 हजार 74 पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 52 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 1 हजार 281 झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मनमाड 7, विंचुर, सटाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर , ओझर येथील रूग्ण आहेत. आज मालेगामध्ये 11 रूग्ण पॉझिटिव्ही आले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 1097 झाला आहेे. जिल्हा बाह्य आकडा 135 वर स्थिर आहे. . तर करोनामुळे आज 7 जणांचा मत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा 284 झाला आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यातील आज 176 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 3 हजार 160 वर पोहचला आहे.

नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत चालला असून एकाच दिवसात नव्याने तब्बल 691 संशित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरातील 405 आहेत. जिल्हा रूग्णालय 12, ग्रामिण 214, मालेगाव 8, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय 18, गृहविलगीकरण 34 रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातून 24 हजार 611 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील 18 हजार 629 निगेटिव्ह आहेत. 5 हजार 587 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 2 हजार 143 रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

एकूण कोरोना बाधित: 5583

नाशिक : 3074

मालेगाव : 1097

उर्वरित जिल्हा : 1281

जिल्हा बाह्य ः 135

एकूण मृत्यू: 284

करोनामुक्त : 3160

- Advertisment -

ताज्या बातम्या