Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात चोवीस तासात १८२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह

नाशकात चोवीस तासात १८२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह

नाशिक । दि. 29 प्रतिनिधी

जिल्हाभरात करोना उद्रेक सुरूच असून सलग पाचव्या दिवशी 100 पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. आज चोवीस तासात 182 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात एकट्या नाशिक शहरातील 123 आहेत यामुळे शहरातील रूग्णांची संख्येने 2 तर जिल्ह्यात करोनाग्रस्तांच्या संख्येने 4 हजाराचा आकडा पार केला आहे. 4043 इतकी करोनाग्रस्तांची संख्या झाली आहे. आज शहरासह जिल्ह्यातील 9 रूग्णांचा मृत्यू झाल्याने करोना बळींची संख्या 234 झाली आहे. तसेच चोवीस तासात 75 रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

- Advertisement -

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार जिल्ह्याभरात नव्याने दाखल झालेल्या संशयित संख्या 494 आहे. यामध्ये नाशिक शहरातील 275 आहेत. जिल्हा रूग्णालय 11, ग्रामिण 183, मालेगाव 15, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय 3 तर गृह विलगीकरणातील 7 रूग्णांचा समावेश आहे. आज दिवसभरात एकुण 182 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये शहरातील 123 रूग्ण आहेत.

यात शहरातील जुने नाशिक, पंचवटी पेठरोड, भद्रकाली, सातपूर, नवीन नाशिक, , मखमलाबादरोड, मेनरोड, नाशिकरोड अशा उपनगरांतील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिकशहराचा आकडा 2040 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 46 रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 848 झाला आहे. तर शांत झालेल्या मालेगावला 13 रूग्ण आढळल्याने मालेगावचा आकडा 1031 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 124 वर आहे. तर करोनामुळे आज 9 जणांचा मत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा 234 झाला आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यातील आज 75 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. या सर्वांची आज रूग्णालयातून मुक्तता करण्यात आली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 2194 वर पोहचला आहे.

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातून 21 हजार 280 जणांचे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील 16 हजार 403 निगेटिव्ह आले आहेत. 4 हजार 43 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 1615 उपचार घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या