पेस्ट ऐवजी उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासले अन्...

पेस्ट ऐवजी उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासले अन्...

मुंबईतील धारावी परीसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे. झोपेतून उठल्यानंतर नजरचुकीने मुलीने टूथपेस्ट समजून विष ब्रशवर घेतलं आणि थेट दात घासण्यास सुरुवात केली. मात्र चव वेगळी लागल्यानंतर हा प्रकार समोर आला. पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. यामध्ये मुलीची मृत्यू झाला.

पेस्ट ऐवजी उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासले अन्...
४९९ रुपयांत करा Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर बुक

सकाळची सुरुवात ही आपली दात घासण्यापासून होत असते. मात्र मुंबईतील धारावीत राहणारी अफसाना खान हिने सकाळी दात घासण्यासाठी अनावधानाने टूथपेस्ट ऐवजी उंदीर मारण्याचे औषध ब्रशवर घेतले. तिला चव वेगळी लागली. त्यामुळे लगेच पेस्ट थुंकून तोंड धुतले. मात्र उंदीर मरण्याचे औषध तोपर्यंत शरीरात पोहचले होते. अफसानाला त्रास होऊ लागला त्यामुळे त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अफसाना ही सध्या शिक्षण घेत होती. तिच्या पाश्चात आई, वीस वर्षीय बहीण आणि दोन लहान भाऊ असे कुटुंब आहे. अफसानाची आई ही फळ विक्रीचा व्यवसाय करते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com