नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; १७ वर्षीय सायकलीस्टने पूर्ण केली काश्मीर ते कन्याकुमारी सायकलराईड

नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; १७ वर्षीय सायकलीस्टने पूर्ण केली काश्मीर ते कन्याकुमारी सायकलराईड

नाशिक | प्रतिनिधी

वाईन कॅपिटलसोबत नाशिकची वाटचाल आता सायकल कॅपिटलकडे होऊ लागली आहे. नाशिकच्या सायकलीस्टसने आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. ओम हितेन्द्र महाजन या १७ वर्षीय युवा सायकलिस्टने काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर अवघ्या आठ दिवसांत सायकलीवर पूर्ण करून नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात यश मिळवले आहे.

ओम महाजन हा रेस अक्रास अमेरिका (रम) स्पर्धा पूर्ण करणाऱ्या नाशिकमधील डॉ हितेंद्र महाजन यांचा मुलगा आहे. त्याने आठ दिवस, सात तास आणि ३८ मिनिटात काश्मीर ते कन्याकुमारी हे ३ हजार ९०० किमीचे अंतर सायकलीवर पूर्ण केले आहे. ओमच्या या विक्रमाची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे.

ओमने १३ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी श्रीनगर येथील लाल चौकातून आपल्या मोहिमेला सुरुवात केली होती. चढउताराचे रस्ते, अवघड घाट वातावरणातील वेगवेगळे बदल याचा सामना करत ओमने आज कन्याकुमारीत दुपारी दोनच्या सुमारास प्रवेश केला.

ओम मोहीम पूर्ण केल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या हेल्पिंग टीमसह सर्वांनीची जल्लोष केला. ओमच्या या विक्रमाची बातमी नाशिकमधील सायकलीस्टला समजल्यानंतर सोशल मीडियातून ओमवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

नितेन ठक्कर हे ओमचे प्रशिक्षक होते तर हेल्पिंग टीममध्ये ओमचे काका डॉ. महेंद्र महाजन, वडील डॉ. हितेंद्र महाजन, डॉ नितीन रौन्दळ, सागर बोंदार्डे, मिलिंद वाळेकर, पुर्वांश लाखळणी, बलभीम कांबळे, कबीर राचुरे, राहुल भांड यांचा समावेश होता.

असा होता मार्ग : श्रीनगर - दिल्ली- झांशी - नागपूर हैदराबाद- बेंगलोर -मदुराई कन्याकुमारी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com