Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासात वाढले एवढे 'पॉझिटिव्ह' रुग्ण

नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासात वाढले एवढे ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच असताना आज चोवीस तासात जिल्ह्यात केवळ 169 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनास काहीसा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांच्या आकडा 12 हजार 657 इतका झाला आहे. तर दुसरीकडे एकाच दिवसात जिल्ह्यातून 1 हजार 13 नवे संशयित दाखल झाले आहेत. आज जिल्ह्यातील 5 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार आज दिवसभरात एकुण 169 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

यामध्ये नाशिक शहरातील 122 रूग्ण आहेत. यात शहरातील जेलरोड, पंचवटी, सातपुर गाव, दसक, उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, हिरावाडी, पेठरोड, जुने नाशिक, वडाळारोड, येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा 8 हजार 41 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 45 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 3 हजार 194 झाला आहे.

यामध्ये सर्वाधिक येवला, सिन्नर, सुरगाणा, नांदुर खुर्द, राणमळा, विंचुर, वणी, पिंपळगाव बसवंत, रावळगाव, उमराळे, इगतपुरी, भगुर, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, नांदगाव, देवळाली कॅम्प येथील रूग्ण आहेत.

मालेगावत आज केवळ 1 रूग्ण आढळा आहे. यामुळे मालेगावचा आकडा 1 हजार 264 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 158 झाला आहे. तर करोनामुळे आज दिवसभरात 5 जणांचा मत्यू झाला.

यामध्ये नाशिक शहरातील 3 तर ग्रामिण भागातील 2 जणांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा 472 झाला आहे.आज दिवसभरात जिल्ह्यातील 473 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 9 हजार 771 वर पोहचला आहे.

करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा मात्र वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने 1 हजार 13 संशित रूग्ण दाखल झाले आहेत.

यामध्ये शहरातील सर्वाधिक 511 तर उर्वरीत जिल्ह्यातील 202 आहेत. जिल्हा रूग्णालय 10, मालेगाव 25, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय 15 व होम कोरोंटाईन 250 रूग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील 43 हजार 464 रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 29 हजार 869 जणांचे निगेटिव्ह आले आहेत. 12 हजार 657 पॉझिटिव्ह आले आहेत तर अद्याप 2 हजार 414 पॉझिटिव्ह रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

एकूण करोना बाधित : 12,657

नाशिक : 8041

मालेगाव : 1264

उर्वरित जिल्हा : 3194

जिल्हा बाह्य : 158

एकूण मृत्यू : 472

करोनामुक्त : 9771

- Advertisment -

ताज्या बातम्या