Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशहेलिकॉप्टरचा भीषण अपघात; १६ जणांचा मृत्यू

हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; १६ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | New Delhi

तीन दिवसांपूर्वी काठमांडू (Kathmandu) येथे हेलिकॉप्टर कोसळून (collapsing) ७२ जणांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला होता. त्यानंतर आता युक्रेनची राजधानी असलेल्या कीवमध्ये (Kyiv) किंडरगार्टनजवळ एका हेलिकॉप्टरचा भीषण अपघात (Accident) झाला आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. त्यावेळी कीवमधील बालवाडीजवळ ही दुर्घटना घडल्याने या अपघातात १६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये युक्रेनचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिसर्स्की यांचा देखील मृत्यू झाला आहे. तर दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे.

दरम्यान, या अपघातात २२ जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रूग्णालयात उपचार (Treatment) सुरू आहेत. तसेच जखमींमध्ये १० लहान मुलांचा देखील समावेश आहे. तसेच अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदत (Help) आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या