नाशकात पंधराशे करोना चाचण्यांचा खर्च जाणार वाया; हे आहे कारण...

करोना अपडेट
करोना अपडेट

नाशिक । प्रतिनिधी

राज्य शासनाकडून येत्या 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या आदेशावर अंतिम निर्णय स्थानिक प्राधिकरणावर सोपविला होता. त्यानुसार आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी 4 जानेवारीपर्यंत शाळा भरणार नसल्याचे स्पष्ट केले...

या महापालिका प्रशासनाकडून गेल्या तीन दिवसांत करण्यात आलेल्या दीड हजार चाचण्यांचा खर्च वाया जाणार आहे. दरम्यान या चाचण्यापैकी आजपर्यंत प्राप्त अहवालास 450 शिक्षकांपैकी 8 जण करोना पॉझिटिव्ह आले आहे.

आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहर व जिल्ह्यात नववी ते बारावी वर्ग 23 नोव्हेंबर रोजी सुरू होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच 4 जानेवारीपर्यंत शाळा ऑनलाईन सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यामुळे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन, चार दिवसांत 1500 शिक्षकांच्या झालेल्या करोना चाचणीचा खर्च वाया गेला आहे. झालेल्या करोना चाचण्यातील प्राप्त अहवालापैकी 8 शिक्षकांना करोना झाला असल्याचे समोर आले आहे.

आता चाचणी झालेल्या शिक्षकांना जानेवारी महिन्यात शाळा सुरू झाल्यास पुन्हा चाचणी करावी लागणार आहे. पुढील वर्षात करोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

राज्य शासनाकडून नुकतेच नववी ते बारावी इयत्तेचे वर्ग सुरू करण्याचे जाहीर केल्यानंतर 23 नोव्हेंबरपासून हे वर्ग सुरू करण्यात येणार होते. यानुसार राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी करीत यात शिक्षकांना करोना चाचणी करण्यास बंधनकारक करण्यात आले होते.

यानुसारच 18 - 19 नोव्हेंबरपासून शिक्षकांनी करोना चाचणीसाठी गर्दी केली होती. यात शासनाकडून नववी ते बारावीच्या विषयांच्या शिक्षकांची चाचणी करण्यात सांगितलेले असताना सर्वच वर्गाच्या शिक्षकांनी गर्दी केल्याने गोंधळ उडाला होता.

अशा तीन दिवसांत महापालिका प्रशासनाकडून 1 हजार 500 शिक्षकांची करोना चाचणीसाठी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

यातील 450 अहवाल प्राप्त झाले असून यात आजपर्यंत 8 शिक्षक करोना पॉझिटिव्ह झाल्याचे स्पष्ट झाली. अजूनही 1 हजार 50 नमुने प्रलंबित आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com