Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशही बँक नव्हे, तर आयकर धाडीत सापडलेले कोट्यावधी रुपये

ही बँक नव्हे, तर आयकर धाडीत सापडलेले कोट्यावधी रुपये

कानपूरमधील अत्तर व्यावसायिक (Kanpur businessman)पीयूष जैन यांच्या घरावर आयकर विभागाने धापा (Tax Raid)टाकला. या छाप्यात आयकर विभागाला (Tax Raid)नोटांनी भरलेली कपाटे सापडली आहेत. या नोटांची मोजणी गेल्या २४ तासांपासून सुरू आहे. दरम्यान, आतापर्यंत या धा्डीत तब्बल १५० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. पीयूष जैन यांच्या घरामध्ये नोटांच्या राशी लागल्या आहेत.जीएसटीचे बनावट ई-वेल बील करुन ही माया जमा करण्यात आली आहे.

Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

- Advertisement -

कन्नौजमधील व्यावसायिक पीयूष जैन यांचा अत्तरचा व्यवसाय आहे. त्यांच्या घरी डीजीजीआय आणि आयकर विभागाने गुरुवारी धाड टाकली होती. यावेळी कपाटांमध्ये मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्याने त्यांची मोजणी करण्यासाठी मशीन मागवावी लागली. गेल्या २४ तासांपासून छापेमारी सुरू आहे. या धाडसत्राची कारवाई अद्याप संपलेली नाही.

रणबीरच्या प्रश्नावर आलिया का लाजली?

पहिल्यांदा ही धाड अहमदाबादच्या डीजीजीआय म्हणजेच जीएसटी इंटेलिजन्स महानिर्देशालयाच्या टीमने टाकली होती. मात्र जेव्हा पीयूष जैन यांच्या घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली तेव्हा या धाडीमध्ये प्राप्तिकर विभागालाही सामील करून घेण्यात आले.

नोटा ठेवण्यासाठी मागवले ६ स्टीलचे बॉक्स

नोटा एवढ्या प्रमाणावर सापडल्या आहेत की त्या ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभागाला आतापर्यंत ६ स्टीलचे मोठमोठे बॉक्स मागवावे लागले आहेत. या बॉक्समध्ये नोटा सील करून प्राप्तिकर विभाग घेऊन जाणार आहे.

जैन हे पान मसाला समूहाचे संस्थापक आहेत. त्यांचा परफ्यूमचाही व्यवसाय आहे. त्यांच्या सात ठिकाणांवर छापेमारी करणअयात आली आहे. या छापेमारीत १५० कोटी रुपयांची अघोषित संपत्तीचा खुलासा झाला आहे. तसेच आयकर विभागाने ९० कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या