
अहमदाबाद | Ahmedabad
अहमदाबादच्या (Ahmedabad) शाहीबाग परिसरातील (Shahibagh Area) ११ मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग (Fire) लागल्याची घटना घडली असून आगीत एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू (Death) झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद अग्निशमन दलाला (Fire Brigade) सकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी कॉल आला होता की, शाहीबाग (Shahibagh) येथील गिरधर नगर सर्कलजवळ असलेल्या ऑर्किड ग्रीन फ्लॅटच्या सातव्या मजल्यावर आग लागली आहे. त्यानंतर लगेचच रुग्णवाहिकेसह अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले.
दरम्यान, आग लागली तेव्हा एका फ्लॅटमध्ये पाच जण अडकले होते. त्यापैकी चार जण बाहेर पडले तर एक १५ वर्षीय मुलगी खोलीत अडकली. त्यानंतर ती मुलगी बाल्कनीकडे गेली आणि तिचा जीव वाचविण्यासाठी विनंती करू लागली. मात्र, त्याचवेळी अग्निशमन दलाचे एक पथक ८ व्या मजल्यावर पोहोचले. त्यावेळी दोरी बांधून पथकातील दोन जण त्या बाल्कनीत पोहोचले. यानंतर त्या मुलीला बाहेर काढून रुग्णालयात नेले असता मुलगी १०० टक्के भाजली (baked) असल्याने डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.