दुतोंड्या मारुती बुडणार; गोदावरीत हंगामातील सर्वाधिक विसर्ग

नदीकाठी सावधानतेचा इशारा; आपत्ती काळात प्रशासनाशी संपर्क साधा
दुतोंड्या मारुती बुडणार; गोदावरीत हंगामातील सर्वाधिक विसर्ग

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरण (Gangapur Dam) सद्यस्थितीत १०० टक्के भरले आहे. त्यामुळे आज दुपारी बारा वाजेपर्यंत गंगापूर धरणातून यंदाच्या हंगामातील सर्वाधिक विसर्ग केला जाणार आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूरमधून १५ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग आज केला जाणार असून नदीकाठी सावधानतेचा इशारा दिला आहे...

जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे (Sagar Shinde, Exucative engineer Water resource dept) यांच्याशी जिल्हाधिकारी मांढरे यांनी चर्चा केली. त्यांच्या चर्चेनुसार, आज दुपारी 12 वाजेपर्यंत गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जाणार आहे. १५ हजार क्युसेक्स पेक्षा अधिक विसर्ग होण्याची शक्यता आहे.

नदीच्या पाण्यात भरीव वाढ होणार असल्याने जिल्हाधिकारी मांढरे यांनी एक एसओपी (SOP) तयार केली असून यामध्ये विभागनिहाय जबाबदार्यांचे वाटप करण्यात आले आहे. गंगापूरमधून पाणी सोडल्यानंतर जायकवाडीपर्यंत ते कसे पोहोचेल.

जिल्ह्यातून गोदावरी नदीकाठी काय दक्षता घेतली पाहिजे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधीक्षक तसेच ग्रामीण पोलिसांचे मदतक्रमांक, आपत्ती ओढवल्यास काय केले पाहिजे. याबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांनी एका पीडीएफद्वारे दिली आहे.

या SOP प्रमाणे सर्व संबंधित विभागानी योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या आहेत.

हायलाईटस

गंगापूर धरण विसर्ग सकाळी 8 वाजता एकूण 5000 क्युसेक करण्यात येणार आहे

गंगापूर धरण विसर्ग सकाळी 9 वाजता एकूण 7000 क्युसेक करण्यात येईल.

गंगापूर धरण विसर्ग सकाळी 10 वाजता एकूण 10000 क्युसेक करण्यात येणार आहे

पालखेड धरणातुन होणारा विसर्ग स.६:३० वा वाढवून ३ हजार ४९६ क्युसेक इतका करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.