अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; १५ भाविकांचा मृत्यू, ४५ बेपत्ता

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; १५ भाविकांचा मृत्यू, ४५ बेपत्ता

दिल्ली | Delhi

अमरनाथ यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी ढगफुटी झाली आहे. त्यानंतर जो जलप्रलय आला त्यात १५ जणांचा मृत्यू झाला.

तसेच ४५ जण बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेवेळी गुहेजळ तब्बल १० ते १५ हजार भाविक उपस्थित होते.

या ठिकाणी अडकलेल्या भाविकांना सध्या पंचतरणीला हलवण्यात आले आहे. हवाई दलातर्फे या ठिकाणी युद्ध पातळीवर मदत व बचावकार्य राबवण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com