नाशिक | प्रतिनिधी

आज ३१ मार्च. आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस. उद्यापासून नवे आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात देशभरात तब्बल अर्धा महिना म्हणजेच १५ दिवस बँका विविध कारणामुळे बंद राहणार आहेत. तर महाराष्ट्र याच बँका दहा दिवस बंद राहणार असल्याचे दिसून येत आहे...

या दिवशी असतील बँकांना सुट्टी

2 एप्रिल - गुड फ्रायडे

4 एप्रिल - रविवार

5 एप्रिल - बाबू जगजीवन राम जयंती निमित्त बँकाना सुट्टी

6 एप्रिल - तामिळनाडूत विधानसभा निवडणुकांमुळे बँका बंद असतील

10 एप्रिल - महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँका बंद असतील

11 एप्रिल - रविवार असल्याने बँका बंद असतील

13 एप्रिल - गुढी पाडवानिमित्त बँकांनी सुट्टी असेल

14 एप्रिल - बाबासाहेब आंबेडकर जयंतीची बँकांना सुट्टी असेल

15 एप्रिल - हिमाचल दिन, बंगाली नवीन वर्ष, बोहाग बिहू आणि सरहुल निमित्ती संबंधित राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

16 एप्रिल - बोहाग बिहूनिमित्त बँका बंद राहतील.

18 एप्रिल - रविवार असल्याने बँका बंद असतील.

21 एप्रिल- रामनवमी निमित्त बँकांना सुट्टी असेल.

24 एप्रिल - चौथा शनिवार असल्याने बँकाना सुट्टी असेल.

25 एप्रिल - रविवार असल्याने बँकाना सुट्टी असेल.