पुण्यात पुन्हा १० दिवस लाॅकडाऊन
मुख्य बातम्या

पुण्यात पुन्हा १० दिवस लाॅकडाऊन

फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार

jitendra zavar

jitendra zavar

पुणे | प्रतिनिधी | Pune

पुणे आणि पिंपरी शहरात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. सोमवार १३ जुलै मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरु होईल. १३ जुलै ते २३ जुलै पर्यंत लॉकडाऊनची घोषणा आज करण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही घोषणा पत्रकार परिषदेत केली. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक सेवा या काळात सुरु राहणार आहेत.

दहा दिवसांपैकी पहिले पाच दिवस अत्यंत कडक स्वरूपाचा लॉकडाऊन असेल. त्यात फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे. नवीन लॉक डाऊन ची नियमावली उद्या सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही पोलीस आयुक्तालय परिसरात लॉकडाऊन लागू असेल. २२ गावांमध्ये कोरोनाच्या केसेस अधिक आहेत. त्यात आणखी गावे समाविष्ट होतील. पुढील दोन दिवस जनतेला पूर्वतयारीसाठी देण्यात आले आहेत.

म्हैसेकर म्हणाले, गेल्या काही दिवसांत पुण्यात कोरोनची संख्या खूप झपाटयाने वाढते आहे. त्या मुळे कोरोना साखळीला ब्रेक लावण्यासाठी हा लॉक डाऊन असेल तसेच या कालावधीत आरोग्य विभागाला सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी वेळ मिळणार आहे.या दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व अधिकारी यांना ऑनलाईन पासेस पोलिस आयुक्त उपलब्ध करून देणार आहे.

लाॅकडाऊनला व्यापाऱ्यांचा विराेध

पुणे शहर व्यापारी संघाचा लॉकडाऊनला विरोध केला आहे. पुणे शहरात परत लॉकडाऊन झाला तर उद्रेक होईल, असे व्यापारी संघाचे अध्यक्ष फत्तेचंद्र राका यांनी म्हटले आहे. सातही दिवस दुकाने उघडी ठेवण्याची मागणी व्यापारी संघाने केली आहे. व्यापारी संघात सुमारे 40 हजार दुकानदार सदस्य आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com