Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या१४ हजार हेक्टवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका

१४ हजार हेक्टवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका

नाशिक । प्रतिनिधी

अतिवृष्टिचा तडाखा जिल्ह्यातील आठ तालुक्यातील शेत पिकांना बसला आहे. १ ते २० आॅक्टोंबर या काळात झालेल्या परतीच्या वादळी पावसाने १४ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. जिल्हा कृषी विभागाने जिल्हाप्रशासनाला नूकसानिचा प्राथमिक अहवाल दिला आहे. अतिवृष्टीमुळे ४४१ गावे बाधित झाली असून त्याचा फटका १९ हजार ७३७ शेतकरी कुटूंबांना बसला आहे….

- Advertisement -

परतीच्या पावसाचा राज्यात धुमाकूळ सुरु आहे. ऑक्टोबरच्या प्रारंभीच सुरु झालेल्या परतीच्या पावसाने आठ तालुक्यांना दिलेल्या जोरदार तडाख्यात भात, टोमॅटो, मक्यासह फुले व द्राक्ष, भाजीपाला आणि काढणीवर आलेल्या अनेक पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

कृषी विभागाकडून या नुकसानीचे पचनामे करण्याचे काम सुरु असून प्राथमिक स्थरावर जवळपास १४ हजार ५४१ हेक्टर क्षेत्र बाधित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यात १ ते १८ आॅक्टोंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत सटाणा,देवळा,दिंडोरी,नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या पाच तालुक्यांना फटका बसला. त्यात ६ हजार ७५५ हेक्टर क्षेत्रावरीलभात,मका,कांदा,सोयाबीन, भाजी-पाला या पिकांचे नुकसान झाले.

यात सर्वाधिक ६ हजार १८५ हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांचे नुकसान झाले. यात ९० गावातील २ हजार ८५२ शेतकरी बाधित झाले. या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरु असतांनाच १९ व २० आॅक्टोंबर ला मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली.

त्यामुळे पुन्हा नुकसानीचा आकडा वाढला. कृषी विभागाच्या प्राथमिक पंचनाम्यांच्या अहवालात दोन दिवसात जवळपास ७ हजार ७८३ हेक्टर क्षेत्रावरीलभात,नागली,वरई,सोयाबीन,कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे.

यात ३५१ गावे बाधित झाली असून त्याचा फटका १६ हजार ८८५ शेतकºयांना बसला आहे. दरम्यान पावसामुळे झालेल्या या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनामार्फत युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. स्थळभेटी करून २० दिवसात झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज १४ हजार ५४१ हेक्टर क्षेत्राचा वर्तविण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या