
मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या समृद्धी (samruddhi Highway) महामार्गाचे अलीकडेच लोकार्पण झाले, याविषयीचा मोठा गाजावाजाही झाला, मात्र शिर्डी-नागपूर (Shirdi-Nagpur) दरम्यानच्या या महामार्गावरील अपघातांच्या मालिकेने रस्ते सुरक्षेचा (Road safety) प्रश्न निर्माण केला आहे.
समृद्धी महामार्गावर आज पुन्हा वाशिमजवळ (Washim) भीषण अपघात झाला आहे (accident) एका खाजगी ट्रॅव्हल बसचा टायर फुटून झालेल्या या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले आहेत.
समृद्धी महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील दोनद जवळ हा अपघाता झाला. नागपूरवरून (Nagpur) मुंबईकडे जाणाऱ्या मेहरा ट्रॅव्हल्सची (Mehra Travels) बस अपघातग्रस्त झाली आहे. भरधाव वेगात असलेल्या या बसचा मागील टायर फुटल्याने बस पलटी होऊन अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
तसेच या अपघातात बसमधील ३० पैकी १४ प्रवाशी जखमी झाले आहेत. तसेच अपघाताचे वृत्त समजताच पोलिस (police) घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने तात्काळ जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींपैकी चार प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, किरकोळ जखमींना कारंजा ग्रामीण रुग्णालयात (Rural hospital) दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी प्रवाशांना अकोला येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.