नाशिकचे आणखी 14 बडे नेते शिंदे गटाच्या वाटेवर

नाशिकचे आणखी 14 बडे नेते शिंदे गटाच्या वाटेवर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) पक्षात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा प्रवेशाचा सिलसिला सुरूच आहे...

आता लवकरच नाशिकमधील विविध पक्षांचे आणखी 14 मोठे नेते त्यात काही माजी नगरसेवक, नगरसेविका यांचा देखील समावेश असणार आहे. ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामध्ये शिवसेनेच्या किती नेत्यांचा समावेश आहे, याबाबत कमालीची गुप्तता ठेवण्यात येत आहे.

येत्या काही दिवसांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया मुंबईत येणार असल्याचे समजते. यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नाशिकमधील नेते कामाला लागले असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री शिंदे गट व उध्दव ठाकरे गट यांच्यातील संघर्ष अधिक धारधार होत आहे.

नाशिकचे आणखी 14 बडे नेते शिंदे गटाच्या वाटेवर
श्रीगणेश जयंती विशेष : नाशिकच्या अष्टविनायकांचे दर्शन घ्या एका क्लिकवर; पाहा व्हिडीओ

एकीकडे न्यायालयात लढाई सुरु असताना शिंदे गटाकडून ठाकरे यांना जोरदार धक्के दिले जात आहे. महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांच्यासह डजनभर नगरसेवकांनी ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात दाखल झाले आहेत.

त्यानंतर आता काही माजी नगरसेवक व पदाधिकारी शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. फेब्रुरवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश प्रक्रिया होणार असल्याचे समजते.

नाशिकचे आणखी 14 बडे नेते शिंदे गटाच्या वाटेवर
Video : मुसळगाव एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या नवीन नाशिक व सातपूरमध्ये पक्षाला अहोटी लागण्याची चिन्हे आहेत. जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste), महानगर प्रमुख प्रवीण तिदमे (Pravin Tidme) यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व्यस्त असल्याचे दिसत आहे.

इतर पक्षांचे अनेक नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात येण्यासाठी इच्छुक आहे. मात्र प्रवेश देण्याबाबत अंतीम निर्णय वरिष्ठ पातळीवर होतात. यासाठी विविध प्रकारचे निकष देखील तपासण्यात येते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com