मुंबई-गोवा महामार्गावर विचित्र अपघात; १४ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर विचित्र अपघात; १४ जखमी

रायगड | Raigad

जिल्ह्यातील पेण तालुक्यातील (Pen Taluka) मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) हमरापूर फाट्याजवळील (Hamrapur Phata) पुलावर पहाटे २ वाजता टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रेलरमध्ये (Tempo Traveler and Trailer) भीषण अपघात (Accident) झाल्याने टेम्पो ट्रॅव्हलरमधील एकूण २२ प्रवाशांपैकी १४ प्रवासी जखमी झाले आहेत...

याबाबत अधिक माहिती अशी की, टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच ४३ बीपी ०७५६) हा खेडवरून मुंबई सांताक्रूझकडे (Khed to Mumbai Santacruz) जात होता. त्यावेळी पेण हमरापूर पुलावरील बंद पडलेल्या कॉईल ट्रेलरला (एमएच ४६ एआर ००७४) मागून धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले.

दरम्यान, या सर्व अपघातग्रस्तांना सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून (Ambulance) तत्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात (Pen Hospital) दाखल केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com