नाशिक मध्ये पुन्हा 133 नगरसेवक?

नाशिक मध्ये पुन्हा 133 नगरसेवक?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik | वाजिद शेख

नाशिक महापालिका (Nashik Municipality) निवडणुका (election) तीन सदस्या एवजी 2017 च्या प्रभाग रचनेनुसार (Ward creation) होणार असल्याची चर्चा होती.

राज्यातील आगामी पालिका निवडणुकीबाबत शिंदे-भाजप सरकारने राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत (State Cabinet Meeting) चार सदस्यीय संख्येनुसारच निवडणुका (election) होणार असल्याचा निर्णय घेतला होता.

मात्र सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) प्रभाग रचनेबाबतचा निर्णय 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतल्याने नाशिक महानगरपालिकेत (Nashik Municipal Corporation) पुन्हा तीन सदस्यीय रचनेनुसार निवडणुक (election) होउन 133 नगरसेवक निवडून जाणार आहे. अशी चर्चा रंगात आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर नाशिक महापालिकेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Govt) असताना व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी भाजपने (BJP) घेतलेल्या चार सदस्यीय प्रभाग रचना रद्द करत नव्याने तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला. नाशिक महापालिकेत नवीन प्रभागरचेनुसार 122 नगरसेवकांवरुन (Corporator) 133 वर सदस्य संख्या गेली. तसेच आरक्षण (reservation) सोडत जाहिर करण्यात आले.

प्रारुप मतदार यादी तयार करुन अंतिम मतदार यादी (voter list) प्रसिध्द करण्यात आली होती. यासाठी महापालिकेतील सर्व यंत्रणा कामाला लागल्याचे चित्र होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्यमंत्रीमंडळाने तीनची प्रभाग रचना रद्द करत पुन्हा चार सदस्य संख्या असलेला प्रभागच होणार असल्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाला न्यायालयाने स्थगीती दिली आहे.

या निर्णयाचा नाशिकच्या राजकीय स्थितीवर काय परिणाम होइल हे येत्या काही दिवसाता समजणार आहे. मात्र चार चा प्रभाग नको याला भाजप वगळ्ता सर्वच पक्षीयांकडून विरोध केला जातोय. नाशिक महानगरपालिकेची निवडणूक होउ न शकल्याने प्रशासकाच्या माध्यमातून कारभार सुरु आहे. नाशिकमध्ये 44 प्रभागातून 133 सदस्य पालिकेत निवडून जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com