१३२४ पोलीस करोनाग्रस्त

२२ करोनायोद्धे शहिद
१३२४ पोलीस करोनाग्रस्त

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यात करोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे.

परिणामी करोनाची पोलीसांनाही लागण झाली आहे. विभागात आतापर्यंत १ हजार ३२४ पोलीस करोनाग्रस्त झाले आहेत. तर २२ पोलीस करोना योद्धे शहिद झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ११ शहिद नाशिक जिल्ह्यातील आहेत.

विभागात करोनाग्रस्तांचा आकडा ९८ हजारच्या घरात पोहचला आहे. हा वेग मोठा आहे. २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून विभागातील पोलीस यंत्रणा रस्त्यावर उभी आहे. नागरीक तसेच पोलीस करोनाग्रास्त होण्याचा प्रारंभ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे झाला.

करोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर मालेगाव येथे पोलीस दलाची संख्या वाढवण्यात आली होती. नाशिकसह जळगाव तसेच इतर जिल्ह्यातील पोलीस व होमगार्ड बंदोबस्तासाठी तेथे कार्यरत होते. यामध्यमातून हा प्रसार वाढत गेला.

आतापर्यंत विभागात १ हजार ३२४ पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच राज्यराखीव दल, रेल्वे पोलीस व इतर दलाचे जवान करोनग्रस्त झाले आहेत. यात सर्वाधिक ३५६ जळगाव जिल्ह्यातील तर दुसरा नंबर २९१ नाशिक जिल्ह्यातील आहेत.

यानंतर २९१ अहमदनगर, तर सर्वात कमी ५४ नंदुरबार जिल्ह्यातील आहेत. आतापर्यंत अडीच हजार पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांची करोना तपासणी करण्यात आली. तर करोनाची तीव्रता अधिक असलेल्या भागात बंदोबस्तासाठी कार्यरत असलेल्या दीड हजार जणांना होम क्वारनटाईन करण्यात आले होते. ९०० जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले असून २१२ जणांवर उपचार सुरू आहेत.

शहिद झालेल्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक ११ पोलीस आहेत. यात ग्रामिण पोलीस दलातील ६ तर शहर आयुक्तालयातील ५ जणांचा सामावेश आहे. या खालोखाल जळगाव व अहमदनगर येथे प्रत्येकी ४ जण शहिद झाले आहेत. धुळे येथे २ तर नंदुरबारला १ पोलीस शहिद झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com