पुण्याला हादरवणारी घटना : अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार

पुण्याला हादरवणारी घटना : अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार

पुणे :

महाराष्ट्रात विशेषत: राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात (Pune) एक संतापजनक घटना घडली आहे. काही नराधमांनी मिळून अवघ्या १३ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची प्रचंड संतापजनक घटना समोर आली आहे.पुण्यातील वानवडीमध्ये (Wanwadi) ही घटना घडली असून, पिडीतेची प्रकृती नाजूक असल्याचे समजते आहे. या घटनेतील सातही नराधमांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

पुण्याला हादरवणारी घटना : अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार
तालिबानकडे सत्ता गेल्यानंतरचा हा पहिला फोटो, विद्यापीठात मुले-मुलींमध्ये पडदा

पुण्यात रेल्वे स्थानक परिसरातून एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन रेल्वेतील दोन कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.संबंधित घटना ही 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत घडल्याची माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेने याबाबत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली.

या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यांना आता न्यायालयात नेले असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत घडत असलेल्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com