अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार : जीभही कपली
मुख्य बातम्या

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार : जीभही कपली

हत्येनंतर मुलीच्या मृतदेहाला शेतात फेकला

jitendra zavar

jitendra zavar

लखनऊ

उत्तर प्रदेशतील लखीमपूर जिल्ह्यात १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन क्रुर हत्या करण्यात आली. या मुलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या जीभ, डोळ्यांसह शरीराच्या इतर भाग कापल्याची भयंकर घटना घडली आहे. हत्येनंतर आरोपींनी मुलीच्या मृतदेहाला उसाच्या शेतात फेकला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका)नुसार कारवाई करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीतील ईसापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पकरिया गावात मुलीच कुटुंब राहते. ही मुलगी शौचासाठी घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती घरी आली नाही. कुटुंबियांनी तिचा शोध घेतल्यावर ती मिळाली नाही. ती बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर ऊसाच्या एका शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला.बलात्कारानंतर मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ज्या शेतात मुलीचा मृतदेह सापडला, ते आरोपीचेच शेत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com