भाजपचे १३ आमदार पक्ष सोडणार : शरद पवारांचे भाकीत

भाजपचे १३ आमदार पक्ष सोडणार : शरद पवारांचे भाकीत
शरद पवार

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस (assembly Election 2022) निवडणुकीत उतरणार आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे १३ आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. पुढील काही दिवसांमध्ये भाजपमधील नेते दररोज पक्ष सोडतील.

मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. उत्तरप्रदेशात भाजपची सत्ता असून येथे निवडणुकीपूर्वी भाजपला एकामागेएक असे झटके बसताना दिसत आहेत. आजच उत्तरप्रदेशातील योगी सरकारमध्ये मंत्री असलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय जनता पक्षाला रामराम करत स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Mourya) यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे.उत्तरप्रदेशच्या जनतेला जी आश्वासने देण्यात आली होती. त्यात सत्यता नाही, त्यामुळे अनेक लोक भाजप सोडून परिवर्तन घडवण्यासाठी येत आहेत हे आता लोकांना कळले आहे.

सिराज मेहंदी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

उत्तरप्रदेशमधील कॉंग्रेसचे अल्पसंख्याक नेते सिराज मेहंदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत शरद पवार यांनी केले. आज उत्तरप्रदेशच्या स्थितीमध्ये खूप बदल झाला आहे. मला आनंद आहे की, जे उत्तरप्रदेशच्या विधानपरिषदेचे सदस्य होते. मागच्या अनेक वर्षांपासून गांधी-नेहरू यांच्या विचारधारेवर काम केले आहे. काँग्रेस पक्षात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आता राष्ट्रवादीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांना सोबत घेऊन उत्तरप्रदेशमध्ये परिवर्तनाची आवश्यकता आहे. समविचारी पक्षांना एकत्र घेऊन एक अल्टरनेटीव्ह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिराज मेहंदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत याचा मला आनंद होत आहे. उत्तरप्रदेशच्या अनेक जिल्ह्यात त्यांचे सहकारी आहेत.मी देखील उत्तरप्रदेशमध्ये जाऊन त्यांच्यासोबत एक जाहीर सभा घेणार आहे असेही शरद पवार यांनी जाहीर केले.

शरद पवार
सावधान : रेल्वे प्रवासासाठी आता हा नियम सक्तीचा

पंतप्रधानांच्या सुरक्षेवर म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या प्रकरणाबाबत कालच सुप्रीम कोर्टाने एक स्वतंत्र चौकशी समिती नेमली आहे. त्यातून वास्तव काय असेल ते समोर येईल. मला वाटतं, पंतप्रधानपद हे एक इन्स्टिट्यूशन आहे. त्यासाठी केंद्र असेल किंवा राज्याने सुरक्षेची जबाबदारी घेतलीच पाहिजे. सुप्रीम कोर्टाने समिती स्थापन केली असल्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार
रेल्वेचा प्रवास महागणार, वाचा कोणाला किती जास्त मोजावे लागणार पैसे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com