
नाशिक | Nashik
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे आज दुपारच्या सुमारास देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची (Devotees) मिनी बस उलटल्याने १३ जण जखमी (wounded) झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जखमी बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana district) चांडोळ गावचे (Chandol village) रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून सर्व जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस उलटल्याचे बोलले जात असून बसमध्ये एकूण २९ प्रवासी होते. त्यापैकी १३ जण जखमी आहेत. तसेच भाविकांनी भरलेली ही बस नाल्यात पलटी होऊन समोरच्या झाडाला अडकल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.