१३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; एकाला अटक

१३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; एकाला अटक

मुंबई | Mumbai

ऐन गणेशोत्सवाच्या (Ganesh festival) काळात मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) १३ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ (Drugs) जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या कस्टम विभागाच्या (Customs Department) अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून या कारवाईत तब्बल १३ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. यात प्रामुख्याने कोकेनचा (Cocaine) समावेश असून एकूण ८७ कोकेनचे कॅप्सूल जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, याप्रकरणी एकाला अटक (Arrested) करण्यात आली आहे. तसेच प्रचंड मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ आढळल्याने अनेक शंका व्यक्त केल्या जात असून पुढील तपास पोलिस (Police) करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com