Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून बारावीची पुरवणी परीक्षा

आजपासून बारावीची पुरवणी परीक्षा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा (HSC Supplementary Examination) 21 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या पुरवणी परीक्षेला आज(दि.21)पासून सुरुवात होत आहे. या परीक्षा 12 ऑगस्टपर्यंत चालनार आहेत.

- Advertisement -

या परीक्षेसाठी नाशिक विभागातून साडेतीन हजार विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेकरीता नाशिक विभागात विज्ञान शाखेतून 662, कला शाखेसाठी एक हजार 771 विद्यार्थी, वाणिज्य शाखेतून 903 आणि एमसीव्हीसी शाखेतून 247 असे एकूण तीन हजार 583 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झालेले आहेत.

विभागात सर्वाधिक दोन हजार 808 विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातून प्रविष्ट झाले आहेत जिल्ह्यातून प्रविष्ट झाले आहेत धुळे जिल्ह्यातून 232, जळगाव 444, नंदुरबार 99 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

बारावीची परीक्षा विभागातील 29 परीक्षा केंद्रांवर होणार आहे. नाशिक जिल्ह्यात 13, धुळे 4, जळगाव 8 आणि नंदुरबारच्या चार केंद्रांचा समावेश आहे. दरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा (दि. 20 ) पासून 8 ऑगस्ट या कालावधीत होईल आणि दहावीची तोंडी परीक्षा 26 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान घेण्याचे नियोजित आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या