जिल्ह्यात 127 शाळा बंदच

ग्रामपंचायत ठरावाचा अडसर; 208 शाळा सुरू
जिल्ह्यात 127 शाळा बंदच

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील (Nashik District) करोनामुक्त (Corona Free) गावांमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा (Secondary and higher secondary schools) सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी सोमवारी तब्बल 127 शाळांची घंटा खणखणली नाही...

या शाळा उघडल्या न गेल्याने बंदच राहिल्या. शाळा सुरू करण्यापूर्वी ग्रामपंचायतींचा शाळा सुरू करण्याबाबतचा आवश्यक ठराव अद्याप झालेला नाही. दुसरीकडे जिल्ह्यातील एकूण 335 पैकी 208 शाळांची घंटा मात्र शाळेच्या पहिल्याच दिवशी खणखणली.

समाजकल्याण विभाग (Social Welfare Department) व आदिवासी आश्रमशाळा (Tribal Ashram School) वगळता जिल्ह्यात इयत्ता आठवीमध्ये 65,942 विद्यार्थी आहेत. इयत्ता नववीत 65 हजार 84, दहावीत 58 हजार 195 विद्यार्थी शिकत आहेत. तसेच इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत 6 हजार 888 शिक्षक (Teachers) आहेत.

या सर्व शिक्षकांना आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र,बहुतांश ठिकाणी सध्या आरटीपीसीआर टेस्टच उपलब्ध नसल्याचे शिक्षकांकडून सांगितले जात आहे.त्यामुळे आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांच्यात समन्वय घडवून शिक्षकांची टेस्ट केली जाणार आहे.

इयत्ता अकरावीत एकूण 39 हजार 402 विद्यार्थी आहेत. तर बारावीमध्ये 40 हजार 527 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना दोन हजार 106 शिक्षक आहेत.

करोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिल्यानंतर जिल्ह्यात एकूण 335 शाळांची घंटा वाजणे अपेक्षित होते. मात्र, गावात एकही रुग्ण असायला नको, सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन गावाने शाळा सुरू करण्यास परवानगी देणे आवश्यक आहे.

त्यामुळे पहिल्या दिवशी 208 शाळा सुरू झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आहे. उर्वरीत शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शाळांना येणार्‍या अडचणी सोडवून येत्या आठ दिवसांच्या आत सर्व शाळा सुरू होण्याची शक्यता शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com