खळबळजनक! इटलीहून आलेल्या विमानात १७९ पैकी १२५ प्रवासी करोना पॉझिटिव्ह

खळबळजनक! इटलीहून आलेल्या विमानात १७९ पैकी १२५ प्रवासी  करोना पॉझिटिव्ह

दिल्ली | Delhi

दोन वर्षांपासून देशावर करोनाचे (covid19) संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाचे (corona update india) रुग्ण झपाट्याने कमी होत असल्यामुळे करोनाचे संकट टळले असे वटत होते.

मात्र पुन्हा एकदा भारतात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यानं चिंता वाढली आहे. तर, ओमायक्रॉन (omicron) प्रकाराचे रुग्णही मोठ्या संख्येनं आढळत आहेत. त्यातच पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

पंजाबमधील अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Amritsar airport) इटलीहून (international chartered flight from Italy) आलेल्या एका विमानातील १२५ प्रवासी करोना संक्रमित (tested positive for Covid-19) आढळून आले आहेत. या विमानात एकूण १७९ प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व प्रवाशांना अमृतसरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणासाठी पाठवले जाणार असल्याचे, राज्य आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले असून, इटलीमध्ये कोविड टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर देखील येथे करोना टेस्ट पॉझिटिव्ह कशी आली? असा सवाल अनेक प्रवाशांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com